Ads

Monday, February 15, 2021

युवराज सिंगच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी दाखल केला FIR

नवी दिल्ली: भारताचा माजी क्रिकेटपूट युवराज सिंगविरुद्ध FIR दाखल झाला आहे. हरियाणा पोलिसांनी रविवारी १४ फेब्रुवारी रोजी हिसार जिल्ह्यातील हांसी ठाण्यात त्याच्याविरुद्ध दाखल केला. वाचा- युवराज सिंगवर २०२० साली दलित समाजाविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. रजत कलसन यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा FIR दाखल करण्यात आला आहे. युवराज सिंगने एका लाइव्ह चॅटमध्ये भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहलविरुद्ध जातीवाचक शब्दाचा वापर केला होता. त्या घटनेनंतर सोशल मीडियावर युवराज सिंगविरुद्ध मोहिम सुरू झाली होती. त्याने माफी मागावी अशी मागणी अनेक जण करत होते. तेव्हा #युवराज_सिंह_माफी_मांगो हा हॅशटॅग काही दिवस टॉपवर होता. अनेकांचा विरोध असल्याने अखेर युवराजने सोशल मीडियावरून माफी मागितली. वाचा- काय आहे प्रकरण रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबतच्या इस्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये एक जातीवाचक शब्द वापरला होता. त्यानंतर दोघांच्या चॅटमधील क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. रोहित शर्मा आणि यांनी अनेक मुद्दयावर लाइव्ह चॅट केले होते. दोघांनी क्रिकेटच्या मैदानावरील आणि बाहेर अनेक गोष्टी एकमेकांसोबत आणि चाहत्यांसोबत शेअर केल्या. यातच भारतीय संघातील गोलंदाज कुलदीप यादव आणि युजवेंद्र सिंह यांच्याबद्दल कमेंट केली. रोहितसोबत बोलताना युवराजने या दोन क्रिकेटपटूंबद्दल जातीवाचक शब्द वापरले. हा शब्द वाल्मिकी समाजाबद्दल होता. आता यावरून सोशल मीडीयावर युवराजने माफी मागावी अशी मागणी केली जात होती. चॅटमध्ये युवराज आणि रोहित दोघे फिरकीपटू चहलच्या टिकटॉक व्हिडिओवर बोलत होते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rS2odu

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...