चेन्नई, : दुसऱ्या कसोटी सामन्यातील पीच हे फिरकी गोलंदाजीला चांगलेच पोषक आहे. कारण आजच्या दुसऱ्या दिवशी तब्बल पंधरा विकेट्स गेल्याचे सर्वांनाच पाहायला मिळाले. त्यामुळे आता या फिरकी खेळपट्टीवरुन चांगलाच आखाडा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. इंग्लंडला माजी कर्णधार मायकल वॉनने यावेळी खेळपट्टीवर जोरदार टीका केली आहे. वॉन आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे की, " चेन्नईची खेळपट्टी ही कसोटी सामन्यासाठी नक्कीच चांगली नाही. कारण पहिल्या कसोटी सामना जर भारतीय संघाने या खेळपट्टीवर अनिर्णीत राखला असता तर त्यांची फलंदाजी या सामन्यात अजून चांगली झाली असतील. पण गेल्या दोन सत्रांमध्ये खेळपट्टीने निराश केले आहे." वॉनला यावेळी ऑस्ट्रेलियाचा माजी महान फिरकीपटू शेन वॉर्नने चांगलेच उत्तर दिले आहे. वॉर्न यावेळी म्हणाला की, " पहिल्या कसोटी सामन्यातही खेळपट्टी फिरकीला पोषक होती. पण त्यावेळी भारतीय संघाला जिंकण्याची संधी नव्हती त्यामुळे खेळपट्टीबाबत कोणीच काही म्हटले नाही. या सामन्यात दोन्ही संघांतील गोलंदाजांना समान संधी आहे. पण इंग्लंडच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली नाही. त्याचबरोबर रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे आणि पंत यांनी चांगली फलंदाजी केली." त्याचबरोबर काही चाहत्यांनीही यावेळी पीचबद्दल आपली मतं व्यक्त केली आहे. चाहत्यांनी म्हटले आहे की, " खेळपट्टीला दोष देण्याचे काहीच कारण नाही. कारण भारताने आजच्या दिवशीच १० षटकांमध्ये ३९ धावा केल्या आणि एकही विकेट गमावली नव्हती. पण इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ३९ धावा करण्यासाठी चार फलंदाज गमावले आणि त्यांना १८ षटके लागली. त्यामुळे एकच दिवशी जर अशा गोष्टी घडत असतील तर खेळपट्टीला दोष देण्यात राहीच अर्थ नाही." काही चाहत्यांनी यावेळी तर इंग्लंडच्या खेळपट्टीचाही दाखला दिला आहे. इंग्लंडच्या खेळपट्टीवर गवत ठेवले जाते आणि तिथे आशियामधील फलंदाजांना खेळणे सोपे नसते. पण आशियामध्ये जेव्हा खेळपट्टी बनवली जाते तेव्हा त्यावर टीका होताना दिसते. त्यामुळे या गोष्टी क्रिकेटमध्ये चालतच राहतील, असे काही चाहत्यांना वाटते आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rQhzE2
No comments:
Post a Comment