चेन्नई, : विराट कोहलीवर दुसऱ्या सामन्यापूर्वी जोरदा टीका होत होती. पण या सामन्यात मात्र कोहली हा आनंदात असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सामना खेळत असताना कोहलीने काही गोष्टी प्रेक्षकांना सांगितल्या. कोहली यावेळी प्रेक्षकांना नेमकं काय सांगत होता, याचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. करोनानंतर पहिल्यांदाच प्रेक्षकांना यावेळी स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आली आहे. वर्षभरानंतर भारतीय चाहते यावेळी स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहत आहे. प्रेक्षक हे भारताच्या संघातील १२व्या खेळाडूचे काम करताता, असे म्हटले जाते. विराट कोहलीनेही यावेळी पहिल्यांदाच स्टेडियममध्ये आलेल्या प्रेक्षकांची मनं जिंकली. भारतीय संघ आज चांगली कामगिरी करत होता. त्यावेळी विराट कोहली हा प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला सांगत होता. त्याचबरोबर आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्सचा संघ हा विसल पोडू म्हणूनही ओळखला जातो. कारण त्यांच्या थीम साँगमध्ये शिट्यांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे कोहली यावेळी प्रेक्षकांना शिट्या मारायलाही सांगत असल्याचे पाहायला मिळाले. कोहली मैदानात नेमकं काय करत होता, याचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्यो कोहली हा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. त्याचबरोबर चाहत्यांना टाळ्या आणि शिट्या मारायलाही सांगत आहे. त्यामुळे कोहलीच्या या गोष्टीमुळे प्रेक्षकही खूष झाले आणि सामन्यातही रंगत वाढल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आता अजिंक्य रहाणेने पिछाडीवर सोडत एक अनोखा विक्रम रचल्याचेही पाहायला मिळत आहे. विराट कोहली या यादीमध्ये पहिल्या १० खेळाडूंमध्येही नाही. कोहलीने या स्पर्धेत १२ सामन्यांमध्ये ४६.३५च्या सरासरीने ७८८ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतकांसह चार अर्धशतकांचा समावेश आहे. या स्पर्धेत अजिंक्यनंतर रोहित हा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे. रोहितने आतापर्यंत या स्पर्धेत ९ सामन्यांमध्ये ८६४ धावा केल्या आहेत. या यादीत रोहित हा नवव्या स्थानावर आहे. यामध्ये रोहितने चार शतकेही लगावलेली आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pfg4gR
No comments:
Post a Comment