Ads

Monday, February 15, 2021

IND vs ENG : फिरकी खेळपट्टीवर धडाकेबाज फलंदाजी करत अश्विनने रचला हा विक्रम

चेन्नई, : चेन्नईच्या खेळपट्टीवर जिथे फलंदाज धारातिर्थी पडताना पाहायला मिळत होते, त्याच खेळपट्टीवर अश्विनने धडाकेबाज फलंदाजी केली. या फलंदाजीबरोबरच अश्विनने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. भारताच्या दुसऱ्या डावात सर्वाधिक धावा आता अश्विनच्या नावावर झाल्या आहेत. पण त्याचबरोबर अश्विनने अजून एका विक्रमाला गवसणी घातली आहे. अश्विनने यावेळी आपलाच एक विक्रम मोडी काढल्याचे पाहायला मिळाले आहे. चेन्नईच्या मैदानात यापूर्वी अश्विनने सर्वाधिक ६७ धावा केल्या होत्या. त्यावेळी प्रतिस्पर्धी संघ इंग्लंडचाच होता. इंग्लंडविरुद्ध २०१६ साली झालेल्या कसोटी सामन्यात अश्विनने ६७ धावांची खेळी साकारली होती. पण आजच्या सामन्यात अश्विनने आपलाच विक्रम मोडीत काढला असून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे घरच्या मैदानात या सामन्यात अश्विनने आतापर्यंतच्या सर्वाधिक धावा केल्याचे पाहायला मिळत आहे. अश्विनने पहिल्या डावात दमदार गोलंदाजी करताना पाच विकेट्स मिळवण्याची किमया साधली होती. ऑस्ट्रेलियापाठोपाठ इंग्लंडविरुद्ध घातक गोलंदाजी करणाऱ्या अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये आज इतिहास घडवला. कसोटी क्रिकेटमध्ये डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम अश्विनने केला. अश्विनने अशा २०० फलंदाजांना बाद केले आहे. कसोटीत अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटच्या ७६ सामन्यात अश्विनने ३९१ विकेट घेतल्या आहेत. यातील २०० विकेट या डाव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांच्या आहेत. जगातील अन्य कोणत्याही गोलंदाजाने अशी कामगिरी केली नाही. त्यामुळे हा कमाल करणारा तो पहिला फिरकीपटू देखील ठरलाय. भारतीय मैदानावर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या फिरकीपटूबाबत अश्विन आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने हरभजन सिंगला मागे टाकले. या यादीत अनिल कुंबळे अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात चौथी विकेट घेत अश्विनने हरभजनला मागे टाकले. हरभजनने भारतात २६५ विकेट घेतल्या. तर अश्विनच्या आता २६८ विकेट झाल्या आहेत. या यादीत ३५० विकेटसह कुंबळे पहिल्या स्थानावर आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u2bMgH

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...