Ads

Monday, February 15, 2021

हातातून बॅट पडली आणि रन आउट झाला पुजारा; पाहा व्हिडिओ

चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत मजबूत स्थितीत असलेल्या भारतीय संघाची तिसऱ्या दिवशी खराब सुरूवात झाली. एक बाद ५४ अशी धावसंख्यावरून भारताची अवस्था ५ बाद ८६ अशी झाली होती. तिसऱ्या दिवशी पहिली विकेट चेतेश्वर पुजाराच्या रुपाने पडली. तो धावबाद झाला. वाचा- फिरकीपटू मोइन अलीच्या १९व्या ओव्हरच्या अंतिम चेंडूवर पुजाराने शॉर्ट लेगच्या दिशने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण तो फार दूर केला नाही. पुजाराने हा शॉर्ट पुढे येऊन मारला. तोपर्यंत ओली पोपने विकेटकिपर फॉक्सकडे चेंडू दिला. पुजाराने बॅट क्रिझवर टेकवली. पण तेव्हा चेंडू विकेटला लागला नव्हता. क्रिझवर पोहोचण्याच्या घाईत त्याच्या हातातून बॅट निसटली आणि फॉक्सने पुजाराला धावबाद केले. पुजारा सात धावांवर बाद झाला. वाचा- पुजारानंतर ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे देखील लवकर बाद झाले. त्यामुळे भारताची अवस्था ५ बाद ८६ अशी झाली. पण त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि आर अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी ९६ धावांची भागिदारी केली आणि भारताला मोठी आघाडी मिळून दिली. विराट ६२ धावांवर बाद झाला. वाचा- भारतीय संघाने पहिल्या डावात ३२९ धावा केल्या होत्या. यात रोहित शर्माने १६१ धावा केल्या होत्या. त्यानंतर आर अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडचा पहिला डाव फक्त १३४ धावांवर संपुष्ठात आला. अश्विने पाच विकेट घेतल्या. भारतीय संघाची आघाडी ४००च्या जवळ पोहोचली असून टीम इंडिया ही आघाडी कितीपर्यंत वाढवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Zi9PhU

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...