Ads

Monday, February 15, 2021

IND vs ENG : अश्विनने सांगितलं शतकाचं रहस्य... ज्या फटक्यामुळे संघातून बाहेर गेलो त्यानेच आज मदत केली

चेन्नई, : अश्विन आज कसोटी क्रिकेटमधील पाचवे शतक झळकावले आणि भारताकडून दुसऱ्या डावात सर्वाधिक धावाही केल्या. अश्विनने आजचा दिवस संपल्यावर या शतकाचे रहस्य सांगितले आहे. ज्या फटक्यामुळे मी संघाबाहेर गेलो होतो, त्याच फटक्याने आज मला शतक झळकावण्यात मदत केली, असे अश्विनने सांगितले आहे. यावेळी तिसरा दिवसाचा खेळ संपल्यावर अश्विन म्हणाला की, " जवळपास १९ वर्षांपूर्वी मी खेळत असताना एक फटका मारला होता आणि त्यानंतर मला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यामुळे गेल्या १२-१३ वर्षांमध्ये मी तो फटका एकदाही मारला नव्हता. पण गेल्या ८-१० दिवसांपासून मी या फटक्याचा सराव केला आणि मी शतक झळकावू शकतो. तो फटका हो स्विपचा. या स्विपच्या फटक्यामुळेच मला १३ वर्षांपूर्वी संघाबाहेर जावे लागले होते. पण त्याच फटक्याने मला आज शतक झळकावताना मदत केली." अश्विनने आपल्या शतकाचे श्रेय कोणाला दिले, पाहा...शतकवीर अश्विन म्हणाला की, " संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी माझ्या फलंदाजीवर जास्त लक्ष दिले. त्यामुळे या शतकाचे श्रेय मी विक्रम राठोड यांना देऊ इच्छितो. राठोड यांची फलंदाजीसाठी मला चांगली मदत झाली. गेल्या काही दिवसांपासून माझ्या फलंदाजीमध्ये जो काही बदल झाला आहे, त्यामध्ये त्यांचाही मोलाचा वाटा आहे. राठोड यांनी मला व्यक्त करण्यास मदत केली. त्यांच्या मार्गदर्शनाचा नक्कीच फलंदाजीमध्ये मला चांगलाच फायदा झाला आहे. त्याचबरोब गेल्या काही सामन्यांमध्ये माझ्या फलंदाजीमध्येही चांगला बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे." घरच्या मैदानात शतक झळकावल्यावर कसे वाटते, पाहा अश्विन काय म्हणाला...अश्विन पुढे म्हणाला की, " हे शतक माझ्या घरच्या मैदानावर आले, याचा आनंदही काही औरच आहे. पण त्याचबरोबर विक्रम राठोड माझ्या फलंदाजीवर मेहनत घेतली. एकावेळी जास्त विचार करायचा नाही, जे समोर आता त्याचाच फक्त विचार करायचा, ही गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली. त्यामुळे गेम प्लॅननुसारच मी खेळत राहिलो आणि यश मिळत गेले. "


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u2klb1

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...