Ads

Saturday, February 13, 2021

IND vs ENG : रोहित शर्माच्या फटकेबाजीवर शून्यावर बाद झालेल्या कोहलीने पाहा कशी दिली प्रतिक्रीया...

चेन्नई, : रोहित शर्माने दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार शतक झळकावले, पण त्याचवेळी कर्णधार विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. पण रोहितच्या शर्माच्या फटकेबाजीवर विराट कोहलीने कशी प्रतिक्रीया दिली आहे, याचा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. गेल्या आठ सामन्यांमध्ये रोहितला एकही शतक झळकावता आले नव्हते. त्यामुळे तब्बल ४७७ दिवसांनंतर हे शतक झळकावता आले आहे. यापूर्वी रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये सहा शतके झळकावली होती. त्यानंतर रोहितचे सातवे कसोटी शतक हे जवळपास दीड वर्षांनी पाहायला मिळाले आहे. त्यामुळे रोहितचे क्रिकेट विश्वात जोरदार कौतुक होत आहे. पण रोहित फटकेबाजी करत असताना कोहलीने भन्नाट प्रतिक्रीया दिल्याचे आता समोर आले आहे. कोहलीला पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही. मोईन अलीच्या दुसऱ्या चेंडूवर विराट क्लीन बोल्ड झाला. चेंडू नेमका कसा आला आणि तो स्टम्पवर कसा आदळला, हे कोहलीला यावेळी समजलेच नाही. त्याचमुळेच क्लीन बोल्ड झाल्यानंतरही तो खेळपट्टीवरच उभा राहीला आणि त्याने समोर उभ्या असलेल्या रोहित शर्माला विराचले की, नेमके काय घडले. आपण क्लीन बोल्ड झालो आहोत, यावर कोहलीचा विश्वासच बसला नव्हता. ही गोष्ट घडली ती मोईन अलीच्या २२व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर. यावेळी चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर पडला आणि तो थेट स्टम्पमधअये घुसला. चेंडू स्टम्पच्या वरच्या भागावर आदळला आणि कोहली क्लीन बोल्ड झाला. कोहली त्यानंतर खेळपट्टीवर उभा राहीला. त्यावेळी तिसऱ्या पंचांनी हा चेंडू पाहिला आणि कोहली आऊट असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतरच कोहलीने मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यापूर्वी काही जणांनी रोहितवर टीका केली होती. रोहित हा ट्वेन्टी आणि वनडेचा खेळाडू आहे, त्याला कसोटी क्रिकेटमध्ये चांगली फलंदाजी करता येत नाही, असे काही जणांनी म्हटले होते. पण रोहितने हे शतक झळकावत चाहत्यांची तोडं बंद केली आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2OqERBU

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...