Ads

Saturday, February 13, 2021

IND vs ENG : रोहित शर्माला हे शतक करण्यासाठी किती दिवस लागले, पाहाल तर हैराण व्हाल...

चेन्नई, : रोहित शर्माने दुसऱ्या कसोटी सामन्यात तडफदार शतक झळकावले. रोहितचे हे कसोटी क्रिकेटमधील सातवे शतक ठरले. पण हे शतक झळकावण्यासाठी रोहितला किती दिवस लागले, हे तुम्हाला माहिती आहे का... रोहितने किती दिवसांनंतर शतक झळकावले आहे, पाहा... रोहितने २०१३ साली कसोटी क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले होते. पण गेल्या आठ सामन्यांमध्ये रोहितला एकही शतक झळकावता आले नव्हते. त्यामुळे तब्बल ४८१ दिवसांनंतर हे शतक झळकावता आले आहे. यापूर्वी रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये सहा शतके झळकावली होती. त्यानंतर रोहितचे सातवे कसोटी शतक हे जवळपास दीड वर्षांनी पाहायला मिळाले आहे. रोहितचे हे शतक भारतीय संघासाठी स्पेशल ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण आतापर्यंत या वर्षात एकाही भारतीय खेळाडूला शतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे भारताकडून यावर्षी पहिले शतक झळकावण्याचा मान रोहितने पटकावला आहे. त्यामुळे या वर्षात रोहित शर्माकडून आणखी किती शतके पाहायला मिळतात, याची उत्सुकता सर्वांनाच असेल. रोहितने यावेळी इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीच्या चेंडूवर दुहेरी धाव घेत आपले शतक साजरे केले. हे रोहितचे सातवे कसोटी शतक ठरले. रोहितने जलदगतीने धावा केल्यामुळेच भारताला लंचपूर्वी शतक पूर्ण करता आले होते. त्यामुळे आता रोहित चांगल्या फॉर्मात आला असून तो किती धावा करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताला यावेळी चांगली सुरुवात मिळाली नाही. कारण भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल हा शून्यावर आऊट झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजाराला जास्त धावा करता आल्या नाहीत. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कोहलीला फक्त पाच चेंडूच खेळता आले आणि एकही धाव न करता तो बाद झाला. पण रोहितने मात्र एक बाजू चांगली लावून धरली. रोहितच्या शतकाच्या जोरावरच भारताला दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी चांगली धावसंख्या उभारता आली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3plHilX

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...