Ads

Thursday, February 11, 2021

IND vs ENG : गूड न्यूज... भारताचा कर्दनकाळ ठरलेला इंग्लंडचा हा खेळाडू दुसऱ्या कसोटीला मुकणार

चेन्नई, : भारतीय संघासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण भारताचा कर्दनकाळ ठरलेला इंग्लंडचा खेळाडू आता दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना हा सामना जिंकण्याची संधी वाढलेली आहे, असे म्हटले जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला विश्रांती देण्याचा विचार इंग्लंडचा संघ करत आहे. कारण भारत आणि इंग्लंड यांच्यात दिवस-रात्र कसोटी सामना होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथे होणार आहे. त्यामुळे या सामन्यापूर्वी जेम्सला विश्रांती देण्याचा निर्णय इंग्लंडच्या संघ व्यवस्थापनाने घेतल्याचे समजते आहे. कारण दिवस-रात्र कसोटी सामन्यात जेम्स इंग्लंडच्या संघासाठी हुकमी एक्का ठरू शकतो, असे त्यांच्या संघ व्यवस्थापनाला वाटत आहे. ही गोष्ट भारताच्या पथ्यावर पडणार आहे. कारण जेम्स हा भारतासाठी कर्दनकाळ ठरलेला आहे. पहिल्या कसोटी सामन्यातही जेम्सने पाच विकेट्स मिळवल्या होत्या. त्याचबरोबर रिव्हर्स स्विंग करण्यात जेम्सचा हातखंडा आहे. त्यामुळे जेम्सचे न खेळणे हे भारतीय संघासाठी चांगले समजले जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याची खेळपट्टी ही फिरकीसाठी पोषक असेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे जेम्ससारख्या अनुभवी वेगवान गोलंदाजाला या सामन्यात खेळवण्याची जोखीम इंग्लंडचा संघ उचलणार नाही. त्याचबरोबर जेम्स आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅशेस मालिकेनंतर जेम्स निवृत्ती घेणार आहे. त्यामुळे त्याला आपली अखेरची मालिका व्यवस्थित खेळता यावी, यासाठी त्याला विश्रांती देण्यात येणार आहे. कारण आता जर जेम्सला दुखापत झाली तर त्याला अखेरची मालिका कशी खेळता येईल, याचा विचार इंग्लंडचा संघ करत आहे. त्यामुळे जेम्सला एका सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. पण जेम्सला दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळवायचे की नाही, यावर सामन्याच्या दिवशी सकाळीच शिक्कामोर्तब हो शकते. कारण संघातील खेळाडूंचा फिटनेस आणि फॉर्म पाहून हा निर्णय घेतला जाऊ शकतो.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pboENV

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...