Ads

Thursday, February 11, 2021

IND vs ENG : कोहली आणि रवी शास्त्री यांच्यावर भडकले कुलदीप यादवचे कोच, म्हणाले...

चेन्नई, : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर कुलदीप यादवचे कोच चांगलेच भडकले आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात फिरीकीला मदत मिळत असतानाही कुलदीपला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे कुलदीपचे कोच कपिल पांडे यांनी कोहली आणि शास्त्री यांच्यावर तोफ डागली आहे. कपिल पुढे म्हणाले की, "कुलदीप जर दुसऱ्या देशाकडून खेळला असता तर त्याला बऱ्याच संधी मिळाल्या असत्या आणि आतापर्यंत त्याने दोनशे विकेट्सही मिळवले असते. भारतीय संघात कुलदीपला चांगली संधी मिळत नाही. पहिल्या कसोटीत अक्षर पटेलच्या जागी नदीमला खेळवले, पण त्याचवेळी कुलदीपवर अन्याय केला. कुलदीपने आपल्या अखेरच्या कसोटी सामन्यात पाच विकेट्स मिळवले होते. त्यानंतरही कुलदीपला भारतीय संघाने संधी दिली नाही. त्यामुळे कुलदीपवर आता दबाव वाढत आहे. वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळाली, नदीनलाही दोनवेळा संधी दिल्या, पण त्याचवेळी कुलदीपला का संधी दिली जात नाही, हेच समजत नाही." कपिल पुढे म्हणाले की, " रवींद्र जडेजा जेव्हा दुखापतग्रस्त झाला तेव्हा भारतीय संघाकडे कुलदीपसारखा चांगला पर्याय होता. त्यावेळी कुलदीपला संधी मिळायला हवी होती. पण संघ व्यवस्थापनाने नदीनला संधी देत सर्वांनाच धक्का दिला. चेन्नईच्या पहिल्या कसोटी सामन्यात आर. अश्विनचा अपवाद वगळला तर अन्य दोन्ही फिरकीपटूंकडून चांगली कामगिरी झाली नाही." कुलदीप यादवचे प्रशिक्षक कपिल यांच्या टीकेचा रोख यावेळी विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यावर होता. पण त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर तोफ डागली आहे. कारण संघाची निवड करण्याचा अधिकार हा कर्णधार आणि प्रशिक्षक यांना असतो. त्यामुळे त्यांचे नाव न घेता कपिल यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात सुंदरला एकही विकेट मिळवता आली नाही. त्याचबरोबर नदीमला चार विकेट्स मिळवता आल्या. पण इंग्लंडच्या फिरकीपटूंकडे चांगला अनुभव नसला तरी त्यांच्याकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे चेन्नईच्या कसोटी जेव्हा कुलदीपऐवजी नदीमला संधी देण्यात आली होती, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3qnVSep

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...