Ads

Tuesday, February 16, 2021

IND vs ENG : अश्विन सामनावीर ठरला असला तरी भारतासाठी गेम चेंजर कोण ठरला, पाहा...

चेन्नई, : दुसऱ्या कसोटी सामन्यात आर. अश्विन हा सामनावीर ठरला. कारण त्याने शतकासह सामन्यात आठ बळी मिळवत विजयात सिंहाचा वाटा उचलला. पण यावेळी जरी अश्विन सामनावीर ठरला असला तरी भारतासाठी गेम चेंजर म्हणून एक खेळाडू नक्कीच ठरला आणि त्यालाच हा पुरस्करा देखील देण्यात आला. विजयानंतर सर्वत्र अश्विनचे कौतुक सुरु आहे, त्याचे कौतुक व्हायलाच हवे. पण ज्याच्यामुळे या विजयाचा पाया रचला गेला, त्याचेही आभार यावेळी मानायला हवेत. भारतासाठी यावेळी गेम चेंजर ठरला तो धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा. कारण रोहित शर्माने या सामन्याच्या पहिल्या डावात दीड शतकी खेळी साकारली होती आणि त्यामुळेच भारताला या विजयाचा पाया रचता आला. या सामन्याच्या पहिल्या दिवशीही चेंडू चांगलाच वळत होता. त्यावेळी विराट कोहलीसह भारताचे तीन फलंदाज बाद झाले होते. एकामागून एक विकेट पडत असताना रोहित ठामपणे खेळपट्टीवर उभा होता आणि समर्थपणे इंग्लंडच्या गोलंदाजीचा सामना करत होता. त्याचबरोबर रोहितने यावेळी अजिंक्य रहाणेबरोबर जी शतकी भागीदारी रचली ती सर्वात महत्वाची ठरली. या भागीदारीमुळेच भारतीय संघाला पहिल्या डावात तिनशे धावांचा टप्पा सहजपणे गाठता आला होता. अश्विनला यावेळी सामनावीर या पुरस्काराने गौरवण्यात आले. पण यावेळी रोहित शर्माची कामगिरीही कोणी विसरू शकले नाहीत. त्यामुळेच रोहित शर्माचा या सामन्यातील गेम चेंजर या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याचबरोबर या सामन्यात कमाल केल्याचा पुरस्कार पदार्पण करणाऱ्या अक्षर पटेलला देण्यात आला. भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवल्यामुळे त्यांचे मनोबल आता कमालीचे वाढलेले असेल. कारण पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने या विजयासह मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. त्यामुळे आता पुढचा सामना नेमका कोणता संघ जिंकतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असेल.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3ppcdxY

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...