चेन्नई, : भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवला. पण त्यानंतरही भारतीय संघाला मोठा धक्का बसू शकतो, कारण भारताचा कर्णधार विराट कोहलीवर बंदी येऊ शकते, असे आता समोर येत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीकडून काही चुका झाल्या. त्याचबरोबर कोहलीने यया सामन्यात चुका झाल्यावरही पंचांशी वाद घातल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर तिसऱ्या पंचांच्या एका निर्णयावर कोहलीने सर्वांसमोर नाराजी व्यक्त केली आणि मैदानातील पंचांबरोबर हुज्जत घातल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता विराट कोहलीवर बंदीची मागणी करण्यात येऊ शकते, असे दिसत आहे. कारण इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी याबाबत आपेल मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर पंचांनी किंवा इंग्लंडच्या खेळाडूंनी कोहलीची तक्रार सामनाधिकाऱ्यांकडे केली तर अशी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण कोहली या सामन्यात धावताना खेळपट्टीच्या डेंजर झोनमध्ये आला होता. त्यावेळी पंचांनी कोहलीला वॉर्निंग दिली होती. पण त्यावेळी कोहली पंचांशी मैदानात हुज्जत घालत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर अजून एक असाच प्रसंग घडल्याचे पाहायला मिळाले. दुसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले. ही गोष्ट अक्षर पटेलच्या तिसऱ्या षटकात घडली. त्यावेळी अक्षरच्या चेंडूचा सामना रुट करत होता. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भारतीय खेळाडूंनी रुट हा झेल बाद झाला आहे, अशी जोरदार अपील केली. पण मैदानातील पंचांनी ही अपील फेटाळली. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंनी बराच विचार केला आणि त्यानंतर डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांनी यावेळी व्हिडीओ पाहायला सुरुवात केली. त्यावेळी चेंडू कुठेही बॅटला लागला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रुट हा झेल बाद झाला नसल्याचे तिसऱ्या पंचांनी सांगितले. त्यानंतर रुट पायचीत बाद आहे की नाही, याची निर्णय घ्यायला तिसऱ्या पंचांनी सुरुवात केली. त्यावेळी चेंडू हा ऑफ स्टम्पच्या बाहेर पडला होता. पण चेंडू स्टम्पच्या लाईनमध्ये पॅडला लागला होता. त्यामुळे चेंडू थेट स्टम्पवर जात असल्याचे पाहायला मिळाले. पण त्यावेळी तिसऱ्या पंचांनी फक्त झेल बादसाठी विचारले होते. त्यामुळे या चेंडूचा इम्पॅक्ट दाखवत असताना त्यांनी पंचांचा निर्णय असल्याचे दाखवले. पण जर तिसरा पंच ही गोष्ट पाहत असेल तर त्यांनी मैदानातील पंचांना याबाबत विचारायला हवे होते. पण तसे झालेले दिसले नाही. यावेळी इंग्लंडचा कर्णधार जो रुट हा पायचीत होत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत होते. पण पंचांनी त्याला नाबाद ठरवले. त्यामुळे कोहली यावेळी या निर्णयावर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला होता. कारण तिसऱ्या पंचांनी पायचीतचा योग्य निर्णय द्यायला हवा, असे त्याचे म्हणणे होते. यावेळी कोहली बराच वेळ मैदानातील पंचांशी वाद घालत असल्याचे पाहायला मिळाले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pxIAe5
No comments:
Post a Comment