चेन्नई: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ३१७ धावांनी शानदार विजय मिळवला. पहिल्या कसोटीत २२७ धावांनी पराभव झाल्यानंतर भारताने शानदार कमबॅक केले आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. वाचा- दुसऱ्या कसोटीत आर अश्विनने एकूण आठ विकेट आणि शतकी खेळी केली. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. अश्विनचे कौतुक सर्वजण करत आहेत. पण आणखी एका भारतीय खेळाडूने शानदार कामगिरी केली आहे. या कसोटीत भारतीय संघाकडून ()ने पदार्पण केले. त्याने पदार्पणाच्या सामन्यात एक खास कामगिरी केली. वाचा- अक्षरने भारतीय संघाच्या विजयात अश्विनसोबत महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्याने या सामन्यात सात विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात अक्षरने पाच विकेट घेतल्या. त्याने २१ षटकात ६० धावा देत ५ गडी बाद केले. भारताकडून कसोटीत पदार्पणात पाच विकेट घेणारा तो २०११-१२ नंतरचा पहिला गोलंदाज ठरला आहे. तर एकूण अशी कामगिरी करणारा तो सहावा गोलंदाज ठरला. वाचा- इंग्लंडला दुसऱ्या डावात विजयासाठी ४८२ धावांचे लक्ष्य दिले होते. ते पार करण्यासाठी त्यांच्याकडे दोन दिवसांचा कालावधी होता. फिरकी गोलंदाजांना अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर इंग्लंडला १६४ धावा करता आल्या. इंग्लंडच्या १० विकेट पैकी सर्व विकेट फिरकीपटूंनी घेतल्या. वाचा- कसोटी पदार्पणात पाचपेक्षा जास्त विकेट घेणारे गोलंदाज ५-६४ व्हीव्ही कुमार विरुद्ध पाकिस्तान (१९६०-६१) ६-१०३ दिलीप दोषी विरुद्ध ऑस्ट्रेलिया (१९७०-८०) ८-६१ आणि ८-७५ नरेंद्र हिरवाणी विरुद्ध वेस्ट इंडिज (१९८७-८८) ५-७१ अमित मिश्रा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२००८-०९) ६-४७ आर अश्विन विरुद्ध वेस्ट इंडिज (२०११-१२) ५-४१ अक्षर पटेल विरुद्ध इंग्लंड (२०२०-२१)
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2ODG4pD
No comments:
Post a Comment