चेन्नई, : पहिल्या कसोटी सामन्यात बऱ्याच जणांनी खेळपट्टीवर टीका केली होती. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी खेळपट्टीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. आता पहिल्या दिवसांपासूनच चेन्नईच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना मदत मिळेल, असे म्हटले जात आहे. पहिल्या कसोटीसाठी बनवलेल्या खेळपट्टीमध्ये पहिले दोन दिवस गोलंदाजांना कोणतीच मदत मिळत नव्हती. याबाबत सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने टीकाही केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या कसोटीसाठी खेळपट्टीमध्ये काही महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. दुसऱ्या सामन्यासाठी खेळपट्टीमध्ये काय बदल केले आहेत, पाहा...पहिल्या कसोटी सामन्यासाठी बनवण्यात आलेल्या खेळपट्टीवर जास्त पाणी टाकण्यात आले होते. त्याचबरोबर रोलरही मारण्यात आला होता. त्यामुळे ही खेळपट्टी पाटा झाली होती. त्यावर गोलंदाजांना पहिल्या दोन दिवसांमध्ये कोणतीच मदत मिळत नव्हती. पण दुसऱ्या कसोटीसाठी बनवण्यात आलेल्या खेळपट्टीवर पाणी टाकणे बंद केले आहे. त्यामुळे आता उन्हाचा जास्त परीणाम खेळपट्टीवर होईल. त्यामुळे खेळपट्टीवरील माती लवकर बाहेर येईल आणि त्यामुळे फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल. दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसापासूनच फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल, असे म्हटले जात आहे. इशांत शर्माने केली होती टीका...पहिल्या कसोटी सामन्यानंतर इशांत शर्मा खेळपट्टीबाबत म्हणाला होता की, " ही खेळपट्टी पहिले दोन दिवस रस्त्यासारखी सपाट होती. त्यामुळे या खेळपट्टीवर पहिले दोन दिवस कोणत्या गोलंदाजांना जास्त मदत मिळाली नाही. पण तिसऱ्या दिवसापासून खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळाला सुरुवात झाली." पहिल्या कसोटीच्या खेळपट्टीबाबत काही भारतीय खेळाडू नाराज असल्याचे पाहायला मिळाले होते. त्याचबरोबर काही जणांनी टीकाही केली होती. आता खेळपट्टीमध्ये बदल करण्यात आला असून दुसऱ्या कसोटी सामन्यात फिरकीपटूंना पहिल्या दिवसापासूनच मदत मिळायला सुरुवात होईल, असे म्हटले जात आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3d1bxfE
No comments:
Post a Comment