Ads

Saturday, February 13, 2021

IND vs ENG 2nd Test: भारताने २९ धावात चार विकेट गमावल्या, पंतचे शानदार अर्धशतक; पहिल्या डावात ३२९ धावा

चेन्नई: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारताने सर्वबाद ३२९ धावा केल्या. भारताकडून रोहित शर्माने दीडशतक तर अजिंक्य रहाणे आणि () यांनी अर्धशतक केले. वाचा- भारताने पहिल्या दिवशी ६ बाद ३०० धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी २९ धावात टीम इंडियाने अखेरच्या ४ विकेट गमावल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा पंत आणि अक्षर पटेल यांनी डावाची सुरूवात केली. अक्षरला बाद करत इंग्लंडने दुसऱ्या दिवशी भारताची सातवी विकेट घेतली. त्यानंतर आलेला इशांत शर्मा शून्यावर बाद झाला. भारताची अवस्था ८ बाद ३०१ अशी झाली. इशांतच्या जागी आलेल्या कुलदीपने पंतसह २४ धावा जोडल्या. दरम्यान पंतने अर्धशतक पूर्ण केले. ही जोडी भारताला ३५० धावसंख्या करून देईल असे वाटत असताना यादव बाद झाला. त्याच्या जागी आलेल्या सिराजने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. पण त्यानंतरच्या चेंडूवर तो बाद झाला. वाचा- इंग्लंडकडून पहिल्या डावात मोइन अलीने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या तर ओली स्टोनने ३ विकेट मिळवल्या. वाचा- काल पहिल्या दिवशी भारताला रोहित शर्माच्या दीड शतकाने आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकाने आधार दिला. रोहितने २३१ चेंडूत २ षटकार आणि १८ चौकारांसह १६१ धावा केल्या. रोहित आणि अजिंक्य जोडीने पाचव्या विकेटसाठी १६२ धावांची भागिदारी केली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3s4Pidd

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...