Ads

Saturday, February 13, 2021

IND vs ENG 2nd Test: रोहित शर्माचे धमाकेदार शतक, संघाच्या ३०० पैकी निम्म्याहून अधिक धावा हिटमॅनच्या

चेन्नई: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ६ बाद ३०० धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून सलामीवीर रोहित शर्मा()ने दीड शतक तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली. वाचा- वाचा- चेन्नईत आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारताला चांगली सुरूवात मिळाली नाही. गेल्या तीन कसोटी दमदार फलंदाजी करणारा शुभमन गिल दुसऱ्याच ओव्हरमध्ये शून्यावर बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा सोबत रोहितने अर्धशतकी भागिदारी केली. ही जोडी संघाला शतक पूर्ण करून देईल असे वाटत असताना पुजारा २१ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेला कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला. त्याला मोइन अलीने एका अफलातून चेंडूवर बोल्ड केले. विराट बाद झाल्याने भारताची अवस्था १ बाद ८४ वरून ३ बाद ८६ अशी झाली. वाचा- विराटच्या जागी आलेल्या उपकर्णधार अजिंक्य रहाणेने रोहितला सुरेख साध दिली. पहिल्या सत्राचा खेळ संपला तेव्हा भारताने १०५ धावा केल्या होत्या. यापैकी ८० धावा एकट्या रोहितच्या होत्या. रोहितने इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव टाकला आणि जोरदार फटकेबाजी केली. रोहितने कसोटी करिअरमधील शतक पूर्ण केले. त्यानंतर दीडशतक देखली साजरे केले. कसोटीत १५० हून अधिक धावा करण्याची ही त्याची चौथी वेळ ठरली. रोहित द्विशतक करेल असे वाटत असताना तो बाद झाला. त्याला जॅक लीचने १६१वर बाद केले. रोहितने २३१ चेंडूत २ षटकार आणि १८ चौकारांसह १६१ धावा केल्या. रोहित आणि अजिंक्य जोडीने पाचव्या विकेटसाठी १६२ धावांची भागिदारी केली. रोहित पाठोपाठ अजिंक्य रहाणे देखील बाद झाला. त्याने ६७ धावा केल्या. वाचा- स्थिर झालेली जोडी बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि आर अश्विन जोडी मैदानात होती. ही जोडी अखेरची षटके खेळून काढेल असे वाटत असताना अश्विन १३ धावाकरून बाद झाला. त्याला जो रूटने बाद केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ६ बाद ३०० धावा केल्या. पंत ३३ तर अक्षर पटेल ५ धावांवर खेळत आहेत. इंग्लंडकडून जॅक लीच आणि मोइन अली यांनी प्रत्येकी दोन तर ओली स्टोन आणि जो रूट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tWHOus

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...