Ads

Saturday, February 13, 2021

हनुमान चालीसा, सचिनचे साई बाबा; क्रिकेटपटू म्हणाला, खेळात धर्म कधीपासून आला

नवी दिल्ली: भारताचा माजी फलंदाज ()ने उत्तराखंडच्या क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर क्रिकेट आणि धर्म यावर वाद सुरू झाला आहे. वासीम जाफरच्या राजीनाम्यावरून सुरू झालेल्या या वादावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी मत व्यक्त केले होते. आता आणखी एका क्रिकेटपटूने त्यावर मत नोंदवले. वाचा- टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू ()ने एका इंग्रजी वृत्तपत्रातील लेखामध्ये खेळ आणि धर्म यासंदर्भात मत व्यक्त केले. त्याने क्रिकेटमधील जुन्या गोष्टींना उजाळा दिला. सचिन तेंडुलकर बॅगेत साई बाबांचा फोटो ठेवत होता. तर जहीर खान आणि हरभजन सिंग हे त्यांच्या त्यांच्या श्रद्धेच्या गोष्टी ठेवत असे. पण कधी वाद विवाद झाला नाही. आमच्यात कधीच या गोष्टींवरून मतभेद झाले नाहीत. आम्ही कधीच हिंदू-मुस्लीम किंवा शिख नव्हतो. आम्ही एकत्र एका देशासाठी खेळत होतो. वाचा- वासीम जाफरसह त्याच्या धर्माबद्दल जे काही सुरू आहे. ती गोष्ट अत्यंत वाइट आहे, असे कैफने लिहले आहे. खेळात धर्म कधीपासून आला? मी उत्तर प्रदेशकडून विविध संघांकडून खेळलो आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. इंग्लंडकडून क्लब आणि काउंटी देखील खेळले आहे. मला कधी कोणी धर्मावरून काही म्हटले नाही. हॉस्टेलमध्ये छोट्या खोलीत आम्ही पाच जण एकत्र रहायचो. भुवन चंद्र हरबोलाची रुम माझ्या समोर होती. रोज सकाळी त्याच्या रुममधून अगरबत्तीचा सुंगध माझ्या खोलीत येत असे. हनुमान चालीसा मी रोज ऐकत असे. मी क्रिकेटपटू झालो आणि तो एक पोलिस अधिकारी, तरी आमची मैत्री कायम राहिली. हरबोला १९९६च्या १५ वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघात कैफसोबत होता. तेव्हा भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला होता.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3b2yz35

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...