Ads

Saturday, February 13, 2021

कसोटीत सचिनबाबत असे घडले होते; आज विराट सोबत झाले

चेन्नई: IND vs ENG 2nd Test भारत आणि चेन्नई यांच्यात चेपॉक मैदानावर दुसरा कसोटी सामना सुरू आहे. देशात तब्बल एका वर्षानंतर प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामना होतोय. या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतकी खेळी केली. तर कर्णधार शून्यावर बाद झाला. या सामन्यात विराटला मोइन अलीने बाद केले. वाचा- दुसऱ्या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब झाली. गिल शून्यावर बाद झाला. त्यानंतर स्थिर झालेल्या चेतेश्वर पुजारा देखील लवकर बाद झाला आणि त्यापाठोपाठ विराट कोहली ( ) शून्यावर बाद झाला. विराट शून्यावर बाद झाला आणि एका नकोशा यादीत त्याचा समावेश झाला. वाचा- वाचा- चेन्नईत सुरू असलेला दुसरा कसोटी सामन्यातील पहिल्या डावात विराट जेव्हा फलंदाजीसाठी मैदानावर तेव्हा तो १५०वा डाव खेळत होता. १५०व्या डावात तो शून्यावर बाद झाला. १५०व्या डावात शून्यावर बाद होणारा तो जगातील नववा फलंदाज ठरला आहे, तर तिसरा भारतीय फलंदाज आहे. विराटच्या आधी सचिन तेंडुलकर () १५०व्या डावात शून्यावर बाद झाला होता. तर सचिनच्या आधी गुंडप्पा विश्वनाथ देखील १५०व्या डावात शून्यावर बाद झाले होते. वाचा- विराटला कसोटी गेल्या काही सामन्यात मोठी धावसंख्या करता आली नाही. गेल्या वर्षी त्याला एकही शतक करता आले नव्हते. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ६ बाद ३०० धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने दीड शतक तर उपकर्णधार अजिंक्य रहाणेने अर्धशतकी खेळी केली.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3d9RSKH

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...