मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू ()चा मुलगा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. प्रथम मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत तो मुंबईकडून खेळला, त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याची संभाव्य खेळाडूंमध्ये निवड झाली. त्याच बरोबर तो आयपीएलच्या लिलावासाठी पात्र ठरला आणि नंतर लिलावात सहभागी होऊन त्याने २० लाख ही बेस प्राइस निश्चित केली. मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईकडून पदार्पण केल्यानंतर विजय हजारे स्पर्धेसाठी अर्जुन तेंडुलकर ()ची निवड होईल असे वाटले होते. पण अंतिम संघात तो स्थान मिळू शकले नाही. आता १८ फेब्रुवारीला होणाऱ्या लिलावात अर्जुनला कोणता संघ, किती रुपयांना खरेदी करतो यावर सर्वांचे लक्ष असेल. वाचा- आयपीएलच्या लिलावाच्या आधी अर्जुन तेंडुलकरने सर्वांचे लक्ष वेधले. रविवारी पोलिस आमंत्रण शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील गट अ च्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात अर्जुनने आपण फक्त गोलंदाज नाही तर एक वेळ पडली तर धमाकेदार फलंदाजी देखील करू शकतो हे दाखवून दिले. त्याने ३१ चेंडूत ७७ धावांची वादळी खेळी केली. २१ वर्षाच्या अर्जुनने ७७ धावात ५ चौकार आणि आठ षटकार मारले. त्याने एका ओव्हरमध्ये पाच षटकार मारून स्फोटक फलंदाजी केली. अर्जुनने फिरकीपटू हाशिर दाफेदारला पाच षटकार मारले. त्याच्या या फलंदाजीमुळे एमआयजी क्रिकेट क्लबने ४५ षटकात ७ बाद ३८७ धावा केल्या. धावांचे विशाल लक्ष्य घेऊन मैदानावर उतरलेल्या इस्लाम जिमखान्याला १९१ धावा करता आल्या. फलंदाजीत धमाका करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने गोलंदाजी देखील कमाल केली. त्याने ३ विकेट घेतल्या. यामुळे एमआयजीला १९४ धावांनी विजय मिळवता आला. वाचा- अर्जुनच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे आयपीएलच्या लिलावात अनेक संघ त्याला घेण्यास उत्सुकता दाखवतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स संघ अर्जुनवर बोली लावतील. अर्जुन गेल्या काही हंगामात मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना नेटमध्ये गोलंदाजी करतोय.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Zg58VE
No comments:
Post a Comment