Ads

Wednesday, February 10, 2021

सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानात उतरणार, अर्जुनच्या आयपीएल लिलावानंतर होणार सामना

मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे एक ट्विट काही दिवसांपूर्वी चांगलेच व्हायरल झाले होते. पण आता सचिन तेंडुलकरने पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सचिनचे हे सामने अर्जुनच्या लिलावानंतर होणार आहेत. सचिनने काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक ट्विट केले होते. सचिनचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर काही जणांनी सचिनवर टीकाही केली होती. पण यााबाबत सचिनने आपले मत व्यक्त केलेले नाही. त्यानंतर सचिन आता पुन्हा मैदानात उतरणार आहे. पण सचिनचे हे सामने आयपीएलच्या लिलावानंतर होणार आहेत. आयपीएलचा लिलाव हा १८ फेब्रुवारीला होणार आहे. या लिलावात सचिनचा मुलगा अर्जुनचाही समावेश करण्यात आला आहे. सचिन तेंडुलकरने नेमके काय ट्विट केले होते...भारताच्या सार्वभौमत्वशी कधीच तडजोड केली जाणार नाही. परदेशातील व्यक्ती फक्त पाहू शकतात पण त्यात भाग घेऊ शकत नाहीत. भारताला भारतीय लोकच ओळखतात आणि भारताबाबतचे निर्णय भारतीयांनीच घेतले पाहिजेत. एक देश म्हणून आपण एकत्र राहूयात, असे सचिनने सोशल मीडियावर म्हटले होते. त्यानंतर काही जणांनी सचिनवर जोरदार टीका केली होती. पण सचिनवर टीका करत असताना त्याने दिलेले देशासाठी दिलेले योगदान मात्र टीकाकार विसरले. त्याचबरोर काही जणांनी तर सचिनसारख्या महान क्रिकेटपटूचा यावेळी अपमानही केला होता. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज २ ते २१ मार्च या कालावधी खेळवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये सचिनबरोबर भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागही खेळणार आहे. त्याचबरोबर क्रिकेट विश्वातील ब्रायन लारा, ब्रेट ली, तिलकरत्ने दिलशानसारखे महान खेळाडूही यावेळी आपल्याला खेळताना दिसणार आहेत. छत्तीसगढ येथील शहीद वीर नारायण सिंग आंतराराष्ट्रीय स्टेडियममध्ये हे सामने खेळवण्यात येणार आहेत. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज का खेळवण्यात येणार आहे...रस्त्यावर बऱ्याच दुर्घटना होत असतात. त्याचबरोबर काही जणांना नियमही माहिती नसतात. या नियमांबाबत लोकांना जागृक करण्यासाठी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे आयोजन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजची सुरुवात झाली होती. पण करोना व्हायरसमुळे या सीरीजचे काही सामने रद्द करण्यात आले होते. आतापर्यंत रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे चारच सामने खेळवले गेले आहेत. या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3730ChQ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...