Ads

Wednesday, February 10, 2021

अर्जुन तेंडुलकरची खराब कामगिरी; मुंबई संघातून डच्चू

मुंबई: आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी या महिन्यात मिनी लिलाव होणार आहे. या लिलावातील सर्वात चर्चेतील नाव म्हणजे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा () होय. अर्जुनने गेल्या महिन्यात झालेल्या सैय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मुंबईकडून दोन सामने खेळले होते. त्यामुळे तो आयपीएलच्या लिलावासाठी पात्र ठरला होता. वाचा- आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकरला कोणता संघ विकत घेईल याची उत्सुकता सर्वांना आहे. येत्या १८ फेब्रुवारी रोजी आयपीएलचा मिनी लिलाव होणार आहे. पण त्याआधी बीसीसीआयद्वारे आयोजित होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी()साठी मुंबई संघात अर्जुनला स्थान देण्यात आले नाही. वाचा- विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईत झालेल्या सराव सामन्यात अर्जुन तेंडुलकरची कामगिरी खराब झाली. त्यामुळेच त्याला संघात स्थान मिळाले नाही. अर्जुनने ४.१ षटकात ५३ धावा दिल्या आणि एकही विकेट मिळवली नाही. तर फलंदाजीसाठी त्याला एकच चेंडू मिळाला. वाचा- अर्जुनने या वर्षी सैय्यद मुश्ताक अली स्पर्धेत पदार्पण केले होते. त्याने हरियाणा आणि पुद्दुचेरी विरुद्ध सामने खेळले होते. अर्जुन जलद गोलंदाज आहे आणि त्याने भारतीय संघ तसेच आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना नेट्समध्ये गोलंदाजी केली आहे. मुश्ताक अली स्पर्धेत अर्जुनने दोन सामन्यात ६७ धावा देत दोन विकेट घेतल्या होत्या. वाचा- आयपीएलच्या लिलावासाठी अर्जुनची बेस प्राइज (मूळ किंमत) यावेळी ठरवण्यात आली आहे. या किंमतीवरुन अर्जुनच्या लिलावाला सुरुवात होणार आहे. या लिलावासाठी अर्जुनची बेस प्राइज ही २० लाख रुपये ठेवल्याचे समजते आहे. त्यामुळे अर्जुनवर या २० लाखांच्या वर लिलावात बोली लागू शकते. पण जर कोणताही संघ अर्जुनवर बोली लावण्यासाठी तयार दिसला नाही तर त्याला त्याच्या बेस प्राइजवरही एखादा संघ आपल्या ताफ्यात सामील करून घेऊ शकतो. वाचा-


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rChzaE

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...