नवी दिल्ली : जगभरात १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. प्रेमाचा दिवस असला तरी क्रिकेट विश्वात असा एक संघ आहे जो या दिवसाला कधीच आठवणीत ठेवणार नाही. आजच्या दिवशी १८९६ साली क्रिकेटमधील एका धक्कादायक विक्रमाची नोंद झाली होती. वाचा- व्हॅलेंटाईन डे दक्षिण आफ्रिकेचा संघाला कधीच लक्षात ठेवू वाटणार नाही. याच दिवशी १८९६ साली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्यांचा फक्त ३० धावांवर ऑला आउट () झाला होता आणि क्रिकेटमधील सर्वात लाजिरवाणा विक्रम आफ्रिकेच्या नावावर नोंदवला गेला होता. वाचा- पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या सामन्यात इंग्लंडने २८८ धावांनी विजय मिळवला होता. इंग्लंडने पहिल्या डावात १८५ धावा केल्या होत्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ फक्त ९३ धावांवर बाद झाला. इंग्लंडने दुसऱ्या डावात २२६ धावा केल्या आणि आफ्रिकेसमोर विजयासाठी ३१९ धावांचे आव्हान दिले. वाचा- पहिल्या डावात ९३ धावांवर बाद झालेल्या आफ्रिकेने दुसऱ्या डावात त्यापेक्षा खराब कामगिरी केली. फक्त १८.४ षटकात आफ्रिकेचा डाव ३० धावात संपुष्ठात आला. हा कसोटी सामना फक्त दोन दिवसात निकाली लागला. इंग्लंडकडून जॉर्ज लोहमॅनने पहिल्या डावात ३८ धावा देत ७ विकेट, तर दुसऱ्या डावात ७ धावा देत ८ विकेट घेतल्या. क्रिकेटच्या इतिहासातील हा दुसऱ्या क्रमांकाचा कमी स्कोअर आहे. १९५५ साली ऑकलंड येथे झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा फक्त २६ धावांवर ऑला आऊट केला होता. पण आफ्रिकेच्या नावावर झालेला या नकोशा विक्रमामुळे ते कधीच हा दिवस लक्षात ठेवणार नाहीत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3tW6lzN
No comments:
Post a Comment