चेन्नई: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीवर भारतीय संघाने मजबूत पकड मिळवली आहे. अश्विनने इंग्लंडच्या पाच फलंदाजांना बाद केले. अश्विनच्या शानदार गोलंदाजीचे सर्वजण कौतुक करत आहेत. त्याने या सामन्यात अनेक विक्रम देखील केले. पण भारतीय संघाचा विकेटकिपर ऋषभ पंतने असा एक कॅच धरला ज्याने चाहत्यांचे मन जिंकले. वाचा- ऋषभ पंतने फलंदाजी करताना नाबाद ५८ धावा केल्या. कसोटी त्याचे हे सलग चौथे अर्धशतक ठरले. त्यानंतर विकेटच्या मागे देखील त्याने शानदार कामगिरी केली. पंतवर अनेकदा कॅच सोडतो अशी टीका केली जाते. तो माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी प्रमाणे चपळ नाही असेही बोलले जाते. पंत जेव्हा चूका करतो तेव्हा त्याला सोशल मीडियावर ट्रोल गेले जाते. पण यावेळी सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. वाचा- वाचा- ... पंतने इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना मोहम्मद सिराजच्या पहिल्याच चेंडूवर सुपर मॅन प्रमाणे एका बाजूला उडी मारून हवेत कॅच घेतला. सिराजने भारतीय डावातील ५०वी ओव्हर टाकली. ही त्याची पहिली ओव्हर होती. सिराजची भारतीय भूमीवरील हा पहिलाच कसोटी सामना होता आणि या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर त्याने ओली पॉपची विकेट मिळवली. वाचा- ही विकेट मिळवण्यात पंतचे योगदान अधिक होते. भारताने ५२ धावांवर इंग्लंडचा निम्मा संघ माघारी पाठवला होता. पण सहावी विकेट मिळवण्यासाठी वेळ लागला. ही विकेट पंतने मिळून दिली. सिराजने टाकलेला चेंडू लेग साइडच्या बाहेर जात होता. पोपने त्याला कट मारण्याचा प्रयत्न केला. पण विकेटच्या मागे उभ्या असलेल्या पंतने उडी मारून शानदार कॅच घेतला. या कॅचनंतर सर्व भारतीय संघातील खेळाडूंनी त्याचे कौतुक केले. तर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षावर केला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3de97uq
No comments:
Post a Comment