नवी दिल्ली: आयपीएलच्या १४व्या हंगामासाठी मिनी लिलाव १८ फेब्रवारी रोजी होणार आहे. गेल्यावेळी स्पर्धा करोना व्हायरसमुळे देशाबाहेर झाली होती. पण यावेळी भारतात होणार आहे. एप्रिलपासून होणाऱ्या ही स्पर्धेसाठी आठ संघांनी तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेतील विराट कोहली नेतृत्व करत असलेला () संघाला एक नवा कोच मिळाला आहे. वाचा- भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज () यांनी RCBच्या फलंदाजीचा कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २०२१च्या हंगामासाठी बांगर यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. बांगर २०१४ साली भारतीय क्रिकेट संघाचे फलंदाजीचे कोच होते. तेव्हा मुख्य कोच रवी शास्त्री होते. २०१९ पर्यंत बांगर भारतीय संघाचे फलंदाजीचे कोच होते. पण त्यानंतर विक्रम राठोड यांनी त्यांची जागी घेतली. वाचा- वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर बांगर यांना पदावरून हटवण्यात आले. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गोलंदाजीचे कोच भरत अरुण यांना त्यांच्या टीममध्ये सहभागी करून घेतले पण बांगर यांना घेतले नाही. वाचा- संघाने सोशल मीडियावरून संजय बांगर या हंगामासाठी फलंदाजीचे कोच असतील. त्यांचे स्वागत! वाचा- वाचा- बांगर यांनी भारतीय संघाकडून २००१ ते २००४ या काळात १२ कसोटी आणि १५ वनडे खेळल्या आहेत. याआधी विराट कोहली सोबत काम करणारे बांगर आता पुन्हा त्याच्या सोबत काम करतील. गेल्यावेळी भारतीय संघासाठी तर यावेळी आयपीएलमध्ये आरसीबीसाठी काम करणार आहेत. वाचा- गेल्या काही वर्षापासून विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबी संघाला एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही. विराटचा संघ अंतिम फेरीत पोहोचला पण विजेतेपदाने हुलकावणी दिली. आता या वर्षी विराट आणि आरसीबीला यश मिळेल का याची सर्वांना उत्सुकता आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Z9IKx7
No comments:
Post a Comment