चेन्नई: 2nd test भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईत दुसरा कसोटी सामना सुरू आहे. भारतीय संघाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. या सामन्यात फिरकीपटूंनी दहशत निर्माण केली. अश्विनने इंग्लंडच्या पहिल्या डावात ५ विकेट घेतल्या. यात इंग्लंडचा अष्ठपैलू बेन स्टोक्सचा देखली समावेश होता. स्टोक्सला बाद केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पण त्याच बरोबर स्टोक्सचा आणखी एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. वाचा- स्टोक्स हा आक्रमक क्रिकेटपटू आहे. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अश्विनने एक शानदार चेंडू टाकून त्याची बोल्ड काढली. अशा पद्धतीने बोल्ड झाल्यानंतर स्टोक्सला राग अनावर झाला. अश्विने बाद केल्यानंतर स्टोक्स बॅट अपटत मैदानाबाहेर जात होता. त्याने जेव्हा सीमारेषा ओलांडली तेव्हा पॅव्हेलियनच्या आत पोहोचण्याआधी स्टोक्सने हेल्मेट जमीनीवर फेकले आणि त्याला लाथ मारली. वाचा- सोशल मीडियावर स्टोक्सचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेक युझर्सनी स्टोक्सच्या या वागण्यावर टीका केली आहे. क्रिकेट हा जंटलमनचा गेम असल्याची आठवण त्यांनी करून दिली. वाचा- पहिल्या डावात इंग्लंडला फक्त १३४ धावा करता आल्या. स्टोक्सने १८ धावा केल्या. इंग्लंडकडून बेन फॉक्सने ४२ धावा केल्या. अश्विनने ४३ धावा देत ५ विकेट घेतल्या. तर इशांत शर्मा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट, भारतातील पहिल्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3u9ZRgS
No comments:
Post a Comment