Ads

Friday, February 12, 2021

India vs England 2nd Test :दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघात मोठा बदल; चौघांना बाहेर बसवण्याची वेळ

चेन्नई: 2nd Test भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत २२७ धावांनी शानदार विजय मिळवणाऱ्या इंग्लंड संघाला दुसऱ्या कसोटी सामन्याच्या २४ तास आधी मोठा धक्का बसला आहे. भारताविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली असली तरी आता दुसऱ्या कसोटीत मात्र त्यांना मोठा बदल करावा लागला आहे. वाचा- इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर केले आहे. या संघात एक दोन नव्हे तर चार बदल करण्यात आले आहेत. इंग्लंडने डॉम बॉस, जेम्स एडरसन, जोफ्रा आर्चर आणि जोश बटलर या चौघांना संघाबाहेर बसवले आहे. या चौघांच्या जागी संघात मोइन अली, बेन फोक्स, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स आणि ओली स्टोन यांना स्थान देण्यात आले आहे. वाचा- जोश बटलर भारताविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटीतून संघाबाहेर झाला आहे. त्याच्या जागी संपूर्ण मालिकेत आता बेन फोक्स विकेटकिपर म्हणून जबाबदारी स्विकारणार आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने शुक्रवारी ही माहिती दिली. एडरसनला फिट होण्यासाठी विश्रांती देण्यात आली आल्याचे त्याने सांगितले. वाचा- पहिल्या कसोटीत द्विशतक झळकावणारा इंग्लंडचा कर्णधार जो रूटकडे दुसऱ्या कसोटीत देखील सर्वांचे लक्ष असेल. त्यांनी कसोटीत सलग तीन शतक केली आहेत. १००व्या कसोटीत द्विशतक करण्याची अनोखी कामगिरी त्याने केली होती. आता १०१व्या कसोटीत तो काय करतोय याकडे सर्वांची नजर असेल. वाचा- वाचा- दुसऱ्या कसोटीसाठी असा आहे इंग्लंडचा संघ-डॉम सिबली, रोरी बर्न्स, डॅन लॉरेंन्स, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स, मोइन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स, जॅक लीच आणि ओली स्टोन


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2LO3702

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...