चेन्नई: 2nd Test day 3 ()ने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचा डोंगर दिला आहे. तिसऱ्या दिवशी अश्विनचे शतक आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात २८६ धावा केल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ३ बाद ५३ धावा केल्या होत्या. इंग्लंडला विजयासाठी ४२९ धावांची गरज आहे. त्यांच्याकडे दोन दिवसांचा कालावधी आहे. पण गोलंदाजांना साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर भारतीय संघाला विजयासाठी फक्त ७ विकेटची गरज आहे. आज दिवसभरात १४ विकेट पडल्या. यात तिसऱ्या दिवसाची सुरुवात रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजार यांनी केली. पण भारताची सुरूवात खराब झाली. पुजारा ७ वर धावबाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे ऐवजी ऋषभ पंत वरच्या फलंदाजीला आला. तो वेगाने धावा करेल असे वाटत होते. मात्र जॅक लीचने त्याला ८ धावांवर माघारी पाठवले. पंतच्या जागी आलेला अजिंक्य १० धावा करून बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था १ बाद ५४ वरून ५ बाद ८६ झाली. त्यानंतर आलेल्या आर अश्विनने कर्णधार विराट कोहली सोबत सहव्या विकेटसाठी ९६ धावांची भागिदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी अर्धशतक पूर्ण केले. विराट कोहलीने संयमी फलंदाजी केली. त्याला ६२ धावांवर मोइन अलीने बाद केले. विराट बाद झाला तेव्हा अश्विनने ६०च्या दरम्यान धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने अखेरच्या चार फलंदाजांसह भारताला २८६ धावांपर्यंत नेले आणि कसोटी क्रिकेटमधील पाचवे शतक पूर्ण केले. अश्विन शतकाच्या जवळ पोहोचल्यावर अखेरचा फलंदाज मोहम्मद सिराजने त्याला चांगली साथ दिली. सिराज १६ धावांवर नाबाद राहिला. अश्विनने १४८ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकारासह १०६ धावा केल्या. कसोटीत शतक आणि पाच विकेट घेण्याची कामगिरी अश्विनने करिअरमध्ये तिसऱ्यांदा केली. अश्विनने पहिल्या डावात इंग्लंडच्या पाच फलंदाजांना बाद केले होते. इंग्लंडकडून जॅक लीच आणि मोइन अली यांनी प्रत्येकी ४ विकेट घेतल्या. भारतीय संघाने दुसऱ्या डावात २८६ धावा केल्या. पहिल्या डावात घेतलेल्या १९७ धावांच्या आघाडीमुळे टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी ४८२ धावांचे लक्ष्य दिले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2Zi8Der
No comments:
Post a Comment