Ads

Friday, February 5, 2021

IND vs ENG : शंभराव्या कसोटीत शतक झळकावण्याचा मान आतापर्यंत कोणाला मिळाला आहे, पाहा...

चेन्नई, : शंभरावा कसोटी सामना हा प्रत्येक खेळाडूसाठी महत्वाचा असतो. पण शंभराव्या कसोटीत शतक झळकावण्याचा मान मात्र क्रिकेट विश्वात आतापर्यंत फक्त काही जणांनाच मिळाला आहे. जो रुटने आजच्या सामन्यात हा मान पटकावला आहे. पण आतापर्यंत आपल्या शंभराव्या कसोटी सामन्यात कोणत्या फलंदाजांना शतकं झळकावता आलेली आहेत, पाहा... शंभराव्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा रुट हा क्रिकेट जगतातील फक्त नववा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी आपल्या शंभराव्या कसोटीत शतक झळकावण्याचा मान कॉलिन काऊड्री (इंग्लंड), जावेद मियाँदाद (पाकिस्तान), गॉर्डन ग्रनिज (वेस्ट इंडिज), अॅलेक स्टुअर्ट (इंग्लंड) इंझमाम उल हक (पाकिस्तान), रिकी पाँटींग ( ऑस्ट्रेलिया), ग्रॅमी स्मिथ (दक्षिण आफ्रिका), हशिम आमला (दक्षिण आफ्रिका) आणि आता जो रुट यांनी पटकावलेला आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रुटने शंभराव्या कसोटीत आपले शतक साजरे केले. आतापर्यंत बऱ्याच काही क्रिकेटपटूंनी शंभराव्या कसोटीत शतक झळकावले आहे. पण रुटने जी गोष्ट केली आहे, ती क्रिकेट विश्वात कोणालाही करता आलेली नाही. इंग्लंडच्या कर्णधार जो रुटने शंभराव्या कसोटी शतक झळकावण्याचा पराक्रम केला. पण यावेळी रुटने अशी एक गोष्ट केली की ती आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला करता आलेली नाही. आपल्या ९८, ९९ आणि १००व्या कसोटीत शतक करणारा जो रूट हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी इंग्लंडचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यातील दोन्ही सामन्यांमध्ये रुटने शतक झळकावलेले होते. हे रुटचे अनुक्रमे ९८ आणि ९९ वे सामने होते. भारताविरुद्धच्या शंभराव्या सामन्यातही रुटने दमदार शतक झळकावत क्रिकेटमधील अनोखा विश्वविक्रम रचला आहे. त्याबरोबर रुटचे भारताबरोबर चांगले कनेक्शन असल्याचेही आता पुढे आले आहे. रुट हा जगातील असा एकच क्रिकेटपटू आहे की, ज्याचे सर्व महत्वाचे सामने हे भारतात खेळले गेले. भारतामध्ये पहिला, ५०वा आणि शंभरावा कसोटी सामना खेळणारा रुट हा क्रिकेट विश्वातील पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे. रुटने २०१२ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण नागपूरमध्ये केले होते. या सामन्यात रुटने ७३ धावांची खेळी साकारली होती. रुट आपला ५०वा सामनाही भारतामध्येच खेळला. २०१६ साली रुट आपला ५०वा सामना विशाखापट्टणम येथे खेळला होता. आता आपला शंभरावा कसोटी सामना रुट चेन्नईमध्ये खेळत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात रुटने आतापर्यंत आपले शतक साजरे केले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2O47q81

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...