
चेन्नई: ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचे तारे जमीन पर आल्याचे चित्र इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दिसले. चेन्नईतील एमए चिदंबरम मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटीतील पहिला दिवस इंग्लंडने गाजवला. १००वी कसोटी खेळणारा कर्णधार जो रूट याने शतक झळकावले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ३ बाद २६३ धावा केल्या होत्या. दिवसाच्या अखेरच्या दिवशी जसप्रीत बुमराहने डोनिनिक सिबलीला ८७ धावांवर बाद करत इंग्लंडला तिसरा धक्का दिला. त्याने रुटसह तिसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागिदारी केली. रुट १२८ धावांवर नाबाद आहे. वाचा- पहिल्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने या सामन्यात अक्षर पटेल ऐवजी शाहबाद नदीमला संधी दिली. पटेल दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. इंग्लंडचे सलामीवीर रोरी बर्न्स आणि डोमिनिक सिबली यांनी पहिल्या विकेटसाठी ६३ धावांची भागिदारी केली. भारताचा विकेटकिपर ऋषभ पंतने दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर कॅच सोडला. फिरकीपटू आर अश्विनने बर्न्सची (३३) विकेट घेत भारताला पहिले यश मिळून दिले. त्यानंतर दुसऱ्याच ओव्हरमध्ये बुमराहने डॅनियल लॉरेन्स शून्यावर बाद करत भारताला दुसरे यश मिळून दिले. लागोपाठ दोन विकेट पडल्याने इंग्लंडची अवस्था २ बाद ६३ झाली. लॉरेन्सच्या जागी कर्णधार जो रूट आला. रूटची ही १००वी कसोटी होती. त्याने सिबली सोबत तिसऱ्या विकेटसाठी २०० धावांची भागिदारी करून इंग्लंडला मजबूत स्थितीत पोहोचवले. वाचा- वाचा- या दोघांनी प्रथम अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर कर्णधार रूटने आरामात १०० झळकावले. १००व्या कसोटीत शतक करणारा तो जगातील नववा तर ९८,९९ आणि १०० अशा तिनही कसोटीत शतक करणारा तो पहिला फलंदाज ठरला. वाचा- वाचा- पहिल्या दिवशी पहिले सत्र वगळता भारतीय संघाला फार चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या सत्रात भारताने २ बाद ६७ असे रोखले होते. पण नंतर सिबली आणि रूट यांनी भारतीय गोलंदाजांना विकेट मिळून दिली नाही. भारताने अनुभव नसलेले दोन फिरकीपटू खेळवले. सुंदर आणि नदीम यांच्याकडे फक्त एका कसोटीचा अनुभव आहे. याचा फायदा इंग्लंडच्या फलंदाजांनी घेतला. भारताकडून अश्विन आणि बुमराह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2LslA24
No comments:
Post a Comment