चेन्नई, : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये दुखापतग्रस्त झालेला भारताचा स्टार खेळाडू आता फिट झाला असून तो लवकरच संघात दाखल होणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये दुखापतीमुळे लोकेश राहुलला कसोटी मालिकेत खेळता आले नव्हते. ऑस्ट्रेलियातील मर्यादीत षटकांचे सामने तो खेळला होता. त्यानंतर दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याला संघात स्थान देण्यात आले नव्हते. पण त्यानंतर राहुलला दुखापत झाली आणि तो या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातून बाहेर पडला होता. पण आज मंगळवारी आपण पूर्णपणे फिट असल्याचे राहुलने सांगितले आहे. त्यामुळे आता लवकरच तो भारतीय संघात दाखल होणार आहे. राहुलने आपल्या फिटनेसबाबत एक ट्विट केले आहे. राहुलने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, " मला आनंद आहे की, माझ्या दुखापतींचे चांगले पुनर्वसन करण्यात आले आहे. आता मी पूर्णपणे फिट आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक चांगली मला वाटत आहे. भारताचे प्रतिनिधीत्व करणे हा एक मोठा सन्मन आहे. त्यामुळे मला आता खेळायला कधी मिळणार, याची उत्सुकता आहे. खेळाडूंबरोबर एकत्रित राहण्याचा आनंद काही औरच असतो." दुखपतीनंतर राहुल बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गेला होता. अकादमीमध्ये त्याच्या दुखापतीचे पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर राहुल आता पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो भारतीय संघात दाखल होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जानेवारी महिन्यात बीसीसीआयच्या निवड समितीने राहुलबाबत एक वक्तव्य केले होते. त्यानुसार राहुलची निवड करण्यात आली आहे. पण गेल्या बऱ्याच कालावधीपासून राहुल एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे यावेळी थेट त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्याची मालिका पाच फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. मालिकेतील पहिल्या दोन लढती चेन्नईत होणार आहेत. तर उर्वरित लढती दोन लढती अहमदाबाद येथे होतील. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि इंग्लंडचा कर्णधार जो रूटसह अन्य खेळाडूंना विक्रम करण्याची संधी आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3cBjbgu
No comments:
Post a Comment