
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया गाजवणारा भारताचा युवा वेगवान गोलंदाज टी. नटराजनला बीसीसीआयनेच खेळण्याची परवानगी नाकारली आहे. या गोष्टीचा खुलासा दस्तुरखुद्द नटराजननेच केला आहे. भारतामध्ये आल्यावर एका मुलाखतीमध्ये नटराजनने या गोष्टीचा खुलासा केल्याचे पाहायला मिळाले आहे. हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर नेट बॉलर म्हणून गेला होता. पण त्याच्यातील गुणवत्ता पाहून त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये पदार्पण करण्याची संधी नटराजनला मिळाली आणि हा एक विक्रम आहे. पण भारतात परतल्यावर मात्र नटराजनला क्रिकेट खेळण्याची परवानगी बीसीसीआयने नाकारल्याचे पाहायला मिळत आहे. बीसीसीआयने आपल्याला परवानगी का नाकारली, याचे उत्तरही यावेळी नटराजनने दिले आहे. याबाबत नटराजनने सांगितले की, " भारतात परतल्यावर मी सय्यद मुश्ताक अकली ट्वेन्टी-२० स्पर्धा खेळावी, असे मला तामिळनाडूच्या क्रिकेट संघटनेने सांगितले होते. पण मला ही स्पर्धा खेळता आली नाही. कारण मला ही स्पर्धा खेळण्याची परवानगी बीसीसीआयने दिली नाही. बीसीसीआयने मला सध्याच्या घडीला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मला त्यांनी या स्पर्धेत खेळायची परवानगी दिली नाही. पण यानंतरच्या स्पर्धांमध्ये मला जर खेळायचे असेल तर मला बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागेल. बीसीसीआयने परवानगी दिल्यावरच मी त्यानंतर स्पर्धांमध्ये खेळू शकतो." ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यानंतर नटराजनला विश्रांती घेण्याचा सल्ला बीसीसीआयने दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारताचे बरेच खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे यापुढे असे होऊ नये, यासाठी बीसीसीआय खबरदारीचे उपाय घेत आहे आणि त्यामुळेच नटराजनला सध्याच्या घडीला कोणतीही स्पर्धा खेळण्याची परवागी बीसीसीआयने दिलेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठीही नटराजनची निवड भारतीय संघात करण्यात आलेली नाही. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यानंतर बीसीसीआयने काही खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामध्ये नटराजनचाही समावेश आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात चार कसोटी सामन्याची मालिका पाच फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. मालिकेतील पहिल्या दोन लढती चेन्नईत होणार आहेत. तर उर्वरित लढती दोन लढती अहमदाबाद येथे होतील.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YCM5oo
No comments:
Post a Comment