नवी दिल्ली : आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा स्टार क्रिकेटपटू सुनिल नरिनच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. नरिन आणि त्याची पत्नी अँजेलिना यांच्या कुटुंबात आता एक नवीन पाहुणा आला आहे. नरिनच्या पत्नीने मुलाला जन्म दिला आहे. नरिनने आपल्या बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण नरिन सध्या आपल्या पत्नीबरोबर नसल्याचे समजते आहे. नरिनने डिसेंबर महिन्यातच याबाबतची माहिती दिली होती. आपल्याला जानेवारी महिन्यात बाळ होणार असल्याचे त्याने डिसेंबरमध्येच सांगितले होते. त्यानंतर नरिन आणि अँजेलिना यांनी खास फोटो शूटही केले होते. त्यावेळीही नरिनने आपल्या सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले होते आणि त्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. नरिनने यानंतर एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. नरिनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, " आमच्या ह्रदयात एक जागा रिक्त आहे, याची जाणीव आम्हाला नव्हती. पण ही रीक्त जागा तु भरुन काढली आहेस. तुझ्या या गोंडस चेहऱ्यात आम्हाल देवाची कृपा दिसत आहे. आमचे तुझ्यावर खुप प्रेम आहे." नरिनच्या घरी मुलाचा जन्म झाला असला तरी तो आपल्या पत्नीबरोबर नाही. कारण नरिन हा सध्याच्या घडीला आबुधाबी येथे टी-१० लीग खेळत आहे. या लीगमध्ये नरिनची कामगिरी चांगली होत आहे. नरिनसाठी अजून एक आनंदाची बातमी म्हणजे त्याला कोलकाता नाइट रायडर्स या संघाने रिटेन केले आहे. गेल्यावर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये नरिनला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्याचबरोबर नरिनच्या गोलंदाजी शैलीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यामुळे नरिनला आयपीएलमधील काही सामन्यांना मुकावे लागले होते. पण त्यानंतर नरिनने आपल्या गोलंदाजी शैलीची चाचणी दिली होती. या चाचणीत पास झाल्यानंतर नरिन पुन्हा एकदा मैदानात परतला होता. पण नरिनला या आयपीएलमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. पणण तरीही कोलकाता नाइट रायडर्स संघाने त्याला आपल्या ताफ्यात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3oHQpxb
No comments:
Post a Comment