चेन्नई: icc भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ३१७ धावांनी विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. चेन्नईच्या याच मैदानावर भारताचा पहिल्या कसोटीत २२७ धावांनी पराभव झाला होता. आता याच मैदानावर भारताने ३१७ धावांनी विजय मिळवला. धावांचा विचार करता भारताने इंग्लंडवर मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकिट ठरवणारी आहे. यासाठी या दोन संघासह ऑस्ट्रेलिया देखील स्पर्धेत आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळून इंग्लंडने चॅम्पियनशिप गुणतक्त्यात अव्वल स्थानी झेप घेतील होती तर भारत चौथ्या स्थानावर घसरला होता. आज भारताने मिळवलेल्या विजयामुळे इंग्लंडने अव्वल स्थान गमावले आहे आणि ते चौथ्या स्थानावर घसरले. तर भारतीय संघाने चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. गुणतक्त्यात भारताच्या विजयाची टक्केवारी ६९.७ इतकी तर इंग्लंडची ६७.० इतकी झाली आहे. या गुणतक्त्यातील पहिले दोन संघ लॉर्ड्स मैदानावर फायनल मॅच खेळतील. न्यूझीलंड संघाने आधीच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. वाचा- भारत आणि इंग्लंड यांच्यात अद्याप दोन कसोटी सामने शिल्लक आहेत. त्यामुळे भारताला फायनलमध्ये जायचे असेल तर इंग्लंडचा किमान २-१ किंवा ३-१ असा पराभव करावा लागेल. वाचा- भारतीय संघाने मिळवलेल्या या विजयामुळे इंग्लंडला जर टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर पुढील दोन्ही कसोटी विजय मिळवावा लागेल. तर ही मालिका इंग्लंडने २-१ जिंकला अथवा १-१ किंवा २-२ अशी बरोबरीत सुटली तर ऑस्ट्रेलिया संघ फायनलमध्ये पोहोचेल.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3jUNVuo
No comments:
Post a Comment