नवी दिल्ली: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना उद्यापासून चेन्नईत सुरू होणार आहे. भारतीय संघ मालिकेत ०-१ने पिछाडीवर आहेत. भारतीय संघाला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. चॅम्पियनशिपच्या फायनलच्या रेसमध्ये रहायचे असेल तर टीम इंडियाला दुसरी कसोटी कोणत्याही परिस्थितीत जिंकावी लागले. जर भारताचा पराभव झाला तर ते चॅम्पियनशिपच्या फायनलच्या रेसमधून बाहेर पडतील. वाचा- पहिल्या कसोटीत कर्णधार जो रूटच्या शानदार द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय फलंदाजांसोबत गोलंदाजांनी देखील निराश केले होते. वाचा- वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात इंग्लंड पहिल्या स्थानावर आहे. न्यूझीलंड संघाने याआधीच फायनलमध्ये प्रवेश केलाय. त्यांनी वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विजय मिळून इंग्लंडने ७०.२ गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे. इंग्लंडला जर अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांना भारताविरुद्धची मालिका ३-१, ३-० किंवा ४-०ने जिंकावी लागले. भारताचा पहिल्या कसोटीत पराभव झाल्याने ऑस्ट्रेलियाला देखील फायनलमध्ये पोहोचण्याची संधी मिळाली आहे. जर मालिका १-१ किंवा २-२ अशी बरोबरीत सुटली तरी किंवा २-१ अशी इंग्लंडने जिंकली तरी ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे. वाचा- भारतीय संघाला फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांनी इंग्लंडविरुद्धची मालिका २-१ किंवा ३-१ जिंकावी लागले. गुणतक्यात भारत ६८.२ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/372Fk3R
No comments:
Post a Comment