Ads

Friday, February 12, 2021

Axar Patel Test Debut : एका सामन्यात ७ विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचे पदार्पण

चेन्नई: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी भारतीय संघात तीन बदल करण्यात आले. या सामन्यात अक्षर पटेलने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वाचा- पहिल्या कसोटी दुखापतीमुळे खेळू शकला नाही. मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी फिट झाल्याने त्याला संघात स्थान देण्यात आले. अक्षरने क्रिकेटमधील या सर्वात जुन्या अशा प्रकारात पदार्पण केले. अक्षरला नदीमच्या जागी स्थान देण्यात आले. या शिवाय भारतीय संघात अन्य दोन बदल करण्यात आले. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली. वाचा- सामना सुरू होण्याआधी कर्णधार विराट कोहलीने अक्षरला कसोटी कॅप दिली. भारताकडून कसोटी खेळणारा तो ३०२ वा खेळाडू आहे. अक्षरने २०१४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत ३८ वनडेत ४५, ११ टी-२० सामन्यात ९ विकेट घेतल्या आहेत. एका सामन्यात घेतल्या होत्या ७ विकेट २०१८ साली अक्षर पटेल चर्चेत आला होता. इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळताना अक्षरने एका सामन्यात सात विकेट घेतल्या होत्या. त्याने २७.४ षटकात ५४ धावा देत ७ विकेट घेतल्या होत्या. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या ३९ सामन्यात अक्षरने १३४ विकेट घेतल्या आहेत. गोलंदाजी सोबत तो फलंदाजी देखील करू शकतो. त्याने १ हजार ६६५ धावा केल्या आहेत. चेन्नईत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत प्रेक्षकांना देखील प्रवेश देण्यात आला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3daEyps

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...