Ads

Saturday, December 5, 2020

IND vs AUS : रविवारी भारताला ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी, ही आहेत महत्वाची कारणं

सिडनी, : भारताला रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. भारताला एकदिवसीय मालिका १-२ अशी गमवावी लागली होती. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाला पराभवाची परतफेड करण्याची भारताकडे रविवारी सर्वात मोठी संधी आहे. दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसू शकतो, असे म्हटले जात आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला भारताविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात दुखापत झालेली आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबतचा निर्णय उद्याच घेण्यात येणार आहे. डेव्हिड वॉर्नरला यापूर्वीच दुखापत झाली असून तो या मालिकेत खेळणार नाही. त्यामुळे आता फॉर्मात असलेला फिंच जर खेळणार नसेल तर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कमकुवत होऊ शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियावर आता मालिका पराभवाचे संकट ओढावले आहे. त्यामुळे या गोष्टीचा चांगलाच फायदा भारतीय संघाला होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात दमदार विजय मिळवला होता. ही मालिका तीन सामन्यांची आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात जर भारताने विजय मिळवला तर त्यांना २-० अशी विजयी आघाडी मिळता येऊ शकते. त्याचबरोबर पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यावर भारतीय संघाचे मनोबल उंचावलेले असेल आणि या गोष्टीचा भारतीय संघाला चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळए हा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडी घेतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. भारतीय संघाने पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने ट्वेन्टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो, यावर सर्वांचे लक्ष असेल. त्याचबरोबर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी हा निर्णायक सामना असेल. कारण या सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला तर या मालिकेतील त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या सामन्यात नेमका कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा ट्वेन्टी-२० सामना हा उद्या रविवारी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघात तीन बदल होऊ शकतात. कारण हा सामना भारतासाठी महत्वाचा असेल. कारण या सामन्यात जर भारताने विजय मिळवला तर त्यांना ट्वेन्टी-२० मालिका जिंकता येऊ शकते.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3mJD9rO

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...