मेलबर्न: aus vs ind 2nd test भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ विकेटनी पराभव झाला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. एडिलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव झाला होता. ३६ धावसंख्येवर ऑल आउट झालेला भारतीय संघाला मालिकेत कमबॅक करणे अवघड होईल असे वाटत होते. पण भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिका जिंकू शकतो असा संदेश दिला. वाचा- बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही खराब झाली. पराभवासोबत ऑस्ट्रेलियाला दोन झटके बसले आहे. सामन्यात धिम्या गतीने षटके टाकल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ४० टक्के इतका दंड केला आहे. त्याच बरोबर ICCने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील चार गुण वजा केले आहेत.आयसीसीचे मॅच रेफरी डेव्हिड बून यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियाच्या संघाने निर्धारीत वेळेत दोन ओव्हर कमी टाकल्या. त्यानंतर त्यांनी कर्णधार टीम पेनला ही शिक्षा सुनावली. वाचा- आयसीसीची आचारसंहिता नियम २.२२ नुसार जो संघ धीम्या गतीने गोलंदाजी करतो त्यांना हा दंड केला जातो. संघातील खेळाडूंवर मॅच फ्रीमधून ही रक्कम घेतली जाते. या नियमानुसार एक ओव्हर कमी टाकल्यास २० टक्के इतका दंड केला जातो. वाचा- याच बरोबर सध्या सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील नियम १६.११.२ नुसार एखाद्या संघाने एक षटक कमी टाकले तर दोन अंक इतका दंड केला जातो. त्यानुसार ऑस्ट्रेलियाचे दुसऱ्या कसोटीत एकूण चार गुण कमी झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने ही चूक मान्य केली असून हा दंड देखील स्विकारला आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rAVIBc
No comments:
Post a Comment