मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिकेत भारताचा ४-०ने पराभव होईल अशी भविष्यवाणी करणारा इंग्लंडचा माजी कर्णधार () ला सोशल मीडियावर चाहते ट्रोल करत आहेत. भारतीय संघाने काल मेलबर्न मैदानावर विजय मिळून वॉनची भविष्यवाणी खोटी ठरवली. पण त्यानंतर देखील वॉन जागा झालेला दिसत नाही. वाचा- भारताने दुसऱ्या कसोटीत शानदार कामगिरी करत विजय मिळवला आणि वॉनची भविष्यवाणी खोटी ठरली. वॉन नेहमी भारतीय संघ आणि खेळाडूंवर टीका करत असतो. मेलबर्न कसोटीत मिळवलेल्या विजयानंतर त्याने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या पण या विजयाचे श्रेय मात्र खेळपट्टीला दिले. वाचा- वाचा- जर ऑस्ट्रेलियाने ज्या पद्धतीची खेळपट्टी भारतीय संघाला दिली आहे. तशीच खेळपट्टी एशेस मालिकेसाठी दिली तर इंग्लंडला त्याचा फायदा होईल आणि मोठी संधी देखील असेल. तिसरा कसोटी सामना सिडनी ऐवजी मेलबर्नमध्ये झाला तर भारतीय संघाकडे विजयाची संधी असेल. पण आता देखील मला असेच वाटते की, ऑस्ट्रेलियाचा संघ कमबॅक करेल आणि मालिका ३-१ने जिंकले. भारतीय संघाने गोलंदाजी आणि फलंदाजीत इतकी चांगली कामगिरी करून सुद्धा अजून देखील मायकल वॉनला पुढील सामन्यात भारताचा पराभव होईल असे वाटत आहे. त्याच्या या ट्वीटवर भारतीय चाहत्यांनी उत्तर दिले आहे. वाचा- अनेक भारतीय चाहत्यांनी वॉनला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. भारतीय संघाने वॉनची भविष्यवाणी नेहमीच खोटी ठरवली आहे. तरी देखील तो बोलण्याचे थांबत नाही अशा शब्दात भारतीय चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. कसोटी मालिकेआधी वॉनने भारताचा वनडे आणि टी-२० मालिकेत पराभव होईल असे म्हटले होते. पण भारताने टी-२० मालिकेत विजय मिळवला होता.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/34UTWkA
No comments:
Post a Comment