दुबई: ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाचा परिणाम आयसीसीच्या क्रमवारीत देखील पाहायला मिळाला. भारताचा कर्णधार आणि आर अश्विन वगळता अन्य कोणालाही फायदा झाला नाही. पहिल्या कसोटीनंतर विराटला दोन गुण मिळाले. त्याने पहिल्या डावात ७४ धावा केल्या होत्या. तो पहिल्या स्थानावर असलेल्या स्टीव्ह स्मिथच्या जवळ पोहोचला आहे. स्मिथला दोन्ही डावात मिळून फक्त दोन धावा करता आल्या. वाचा- क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या विराट कोहलीच्या नावावर ८८८ गुण आहेत. स्मिथला १० गुणांचा फटका बसला असून त्याच्या नावावर ९०१ गुण आहेत. चेतेश्वर पुजारा सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरला आहे. तर पुढील तीन सामन्यात भारताचे नेतृत्व ज्याच्याकडे जाणार आहे तो अजिंक्य रहाणे टॉप १० मधून बाहेर पडला आहे. राहणे ११व्या स्थानावर आहे. मयांक अग्रवाल १४व्या स्थानावर घसरला आहे. तर हनुमा विहारी टॉप ५० मधून बाहेर पडत ५३ स्थानावर गेलाय. वाचा- ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशाचे करिअरमधील सर्वोत्तम ८३९ गुण मिळवले आहेत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन चौथ्या स्थानावर कायम आहे. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन ३३व्या स्थानावर पोहोचला आहे. वाचा- वाचा- गोलंदाजीत भारताच्या आर अश्विनने पहिल्या कसोटीत ४ विकेट घेतल्या होत्या. क्रमवारीत त्याने जसप्रीत बुमराहला मागे टाकत नववे स्थान मिळवले. तर बुमराह १०व्या स्थानावर घसरला आहे. सामन्यात सात विकेट घेणारा ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर स्टुअर्ट ब्रॉड आहे. जोश हेजलवूड ८०५ गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2WyTNi8
No comments:
Post a Comment