नवी दिल्ली, : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियामध्ये विजयी पताका फडकावली. अजिंक्य हा एक भावुक व्यक्ती आहे. त्यामुळेच अजिंक्यने भारतीय चाहत्यांसाठी एक भावुक मेसेज लिहिला आहे. अजिंक्यचे हे ट्विट आता चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहे. अजिंक्यने आपल्या या ट्विटमध्ये लिहिले आहे की, " भारतातील ज्या व्यक्ती स्पोर्ट्स पाहतात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलावण्याची ताकद भारतीय संघात नक्कीच आहे आणि आम्ही हे करू शकलो, याचे समाधान आहे. तुम्ही जे आम्हाला प्रेम दिले, ज्यापद्धतीने पाठिंबा दिला, ते आमच्यासाठी फार मोलाचे आहे. तुमच्या प्रेमाची आणि पाठिंब्याची आम्हाला नक्कीच गरज आहे. आगामी दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये आम्ही अथक मेहनत घेऊ..." अजिंक्यसाठी हा मेसेज ठरला टर्निंग पॉइंट...प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात, तसे ते अजिंक्यच्या कारकिर्दीतही आले. ही गोष्ट आहे दक्षिण आफ्रिकेतील. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता आणि कसोटी मालिका सुरु होती. दरबान येथे २९ डिसेंबरला सुरु असलेल्या कसोटी सामन्यात अजिंक्यचे शतक फक्त चार धावांनी हुकले होते. त्यानंतर अजिंक्यला एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये लिहिले होते की, " कसोटी क्रिकेट नेमकं काय असतं आणि त्यामधील शतकाचे मोल किती असते, हे तुला आता नक्कीच समजले असेल." या एका मेसेजनंतर अजिंक्यच्या कारकिर्दीला चांगलीच कलाटणी मिळाल्याचे पाहायला मिळाले. अजिंक्यने या मेसेजला यावेळी उत्तरही दिले होते. अजिंक्य या मेसेजला उत्तर देताना म्हणाला की, " मी तुम्हाला शतकासाठी फार काळ वाट पाहायला लावणार नाही." अजिंक्यने आपला शब्द यावेळी पाळल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यानंतर न्यूझीलंडच्या दौऱ्यात अजिंक्यने शतक झळकावले. अजिंक्यटने यावेळी ११८ धावांची खेळी साकारली आणि आपला शब्द पाळल्याचे पाहायला मिळाले. गावस्कर यांनी केली अजिंक्यची स्तुतीगावस्कर म्हणाले की, " अजिंक्यच्या नेतृत्वाची स्तुती फक्त भारतीय नाही तर ऑस्ट्रेलियाचे दिग्गज खेळाडूही करताना दिसत आहेत. जेव्हा भारतीय संघाने सामना जिंकला तेव्हा रहाणेची ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गज खेळाडूंनीही स्तुती केली. यामध्ये माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग, अॅडम गिलख्रिस्ट, माइक हसी आणि शेन वॉर्न यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश होता. त्यामुळे अजिंक्यने फक्त भारताचीच नाही तर क्रिकेट विश्वातील प्रत्येकाची मनं जिंकली आहेत."
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3aRkze8
No comments:
Post a Comment