नवी दिल्ली : पुढच्या वर्षी भारतामध्ये खेळवण्यात येणार आहे. या विश्वाचषकासाठी आठ ठिकाणं सध्याच्या घडीला ठरवण्यात आली आहेत आणि यावर बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब होणार आहे. भारतातील विश्वचषक कोणत्याआठ ठिकाणी खेळवण्यात येणार आहे, पाहा... पुढच्या वर्षी भारतामध्ये आयपीएल होणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी भारतामध्येच ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकासाठी मुंबई, मोहाली, धर्मशाला, चेन्नई, अहमदाबाद, कोलकाता, दिल्ली आणि बंगळुरु या आठ ठिकाणांचा समावेश करण्यात येणार आहे. या आठ ठिकाणी विश्वचषकाचे सामने खेळवायचे का, याचा अंतिम निर्णय बीसीसीआयच्या बैठकीमध्ये होणार आहे. करोनामुळे या वर्षी भारतात एकही आंतरराष्ट्रीय सामना होऊ शकला नाही. त्यामुळे आता जानेवारीमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेपासून पुढच्या वर्षी क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर इंग्लंडचा संघ भारतामध्ये क्रिकेटच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यानंतर काही दिवसांतच आयपीएल खेळवण्यात येणार आहे. पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये दोन नवीन संघांची एंट्री होऊ शकते, असे काही दिवसांपूर्वी ऐकायला मिळत होते. त्याचबरोबर पुढच्या वर्षी मोठा लिलाव होणार आहे, असेही म्हटले जात होते. पण पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये नेमके किती संघ खेळवायचे, यावर बीसीसीआयने आपला निर्णय घेतला आहे. बीसीसीआयची २४ डिसेंबरला वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीमध्ये या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे. इनसाइड स्पोर्टने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, " सध्याच्या घडीला तरी बीसीसीआय मोठा लिलाव करण्याच्या स्थितीमध्ये नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी मिनी लिलाव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर लिलावाची तारीख लवकरच ठरवण्यात येणार आहे. पण आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात आयपीएलचा लिलाव होणार असल्याचे समजते आहे." बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये दोन संघांची एंट्री होणार नाही. कारण जर दोन संघांची एंट्री झाली असती तर बीसीसीआयला मोठा लिलाव करावा लागला असता. त्यामुळे आता २०२२ साली आयपीएलमध्ये नवीन दोन संघांची एंट्री होऊ शकते, असे म्हटले जात आहे. त्यामुळे आता पुढच्या वर्षी संघांमध्ये मोठे बदल झालेले पाहायला मिळणार नाही.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2JhJL25
No comments:
Post a Comment