मेलबर्न, : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर दमदार विजय मिळवला. विजयानंतर शक्यतो संघात बदल झालेले पाहायला मिळत नाहीत. पण या विजयानंतर मात्र भारतीय संघातील एका खेळाडूला डच्चू मिळू शकतो, असे पाहायला मिळत आहे. भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला असला तरी तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघातील सलामीवीर मयांक अगरवालला डच्चू मिळू शकतो. कारण आतापर्यंत मयांकला दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये संधी मिळाली होती. पण या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये मयांकला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासाठी मयांकला भारतीय संघातून डच्चू मिळण्याची दाट शक्यता आहे. मयांकला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर एकदिवसीय संघातही स्थान देण्यात आले होते. पण या मालिकेतही त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्याचबरोबर कसोटी मालिकेतही तो सातत्याने अपयशी ठरलेला पाहायला मिळाले. आतापर्यंतच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये मयांकला फक्त ३१ धावा करता आल्या आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात मयांकला १७ आणि ९ अशा धावा करता आल्या होत्या. त्याचबरोबर दुसऱ्या कसोटी सामन्यातही मयांक अपयशी ठरला आणि त्याने ० आणि ५ अशा धावा केल्या. नव्या वर्षात तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय संघात नक्कीच काही बदल केले जातील. कारण रोहित शर्मादेखील संघात येणार आहे. त्यामुळे रोहितला जर संघात स्थान द्यायचे असेल तर त्यासाठी मयांकला संघातून बाहेर काढले जाऊ शकते. कारण दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये मयांक अपयशी ठरलेला आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात मयांकला संघाबाहेर काढण्याची दाट शक्यता आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाने यावेळी कमाल केली. पहिल्या सामन्यातील मानहानीकारक पराभव पचवल्यानंतर रहाणेने चांगली संघ बांधणी केली. खेळाडूंना विश्वास दिला आणि त्यामुळेच या सामन्यात भारतीय संघाकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली. अजिंक्यने यावेळी संघात निर्णायक बदल केले आणि तेच भारतासाठी महत्वाचे ठरले. अजिंक्यने पृथ्वी शॉला बाहेर करत शुभमन गिलला संधी दिली आणि त्याने चांगली सलामी दिली. त्याचबरोबर रवींद्र जडेजासारख्या अष्टपैलू खेळाडूला संधी दिली आणि त्याची कामगिरी संघासाठी महत्वाची ठरली. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला पदार्पणाची संधी देत संघात चांगला बदल केला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2KJvVWL
No comments:
Post a Comment