अहमदाबाद : AGM Meeting अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची आज ८९वी वार्षिक सर्वसाधारण सभा अहमदाबाद येथे सुरू आहे. या बैठकीच्या आधी एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने जनरल मॅनेजर ( ) यांना नोकरी सोडण्यास सांगितले गेले आहे. वाचा- बीसीसीआयची ८९वी सभेत काही महत्त्वाच्या गोष्टींवर निर्णय होणार आहे. यातील पहिला निर्णय म्हणजे आयपीएलमधील संघांची संख्या वाढवण्याच होय. बैठकीत २०२२च्या हंगामात दोन नव्या संघांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या शिवाय २०२८ साली होणाऱ्या लॉस एजिलिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासंदर्भात, आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलच्या सदस्यांची नियुक्ती आदीबाबत निर्णय घेतले जाणार आहे. वाचा- पण या बैठकीच्या आधी राव यांना राजीनामा देण्यास सांगितले गेले. राव यांनी एका मेलद्वारे बोर्डाचे आभार मानले आहेत. देशाच्या क्रीडा क्षेत्रात योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल मी बोर्डाचे आभार मानतो असे त्यांनी म्हटले आहे. वाचा- या मेलद्वारे मी तुम्हा सर्वांना ही माहिती देत आहे की, बीसीसीआयने माझी नोकरी २२ डिसेंबर २०२२ पासून थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस आहे. कारण यामुळे मला आयुष्यात चांगली संधी मिळेल. मला आणखी दुसऱ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल, असे राव यांनी इ-मेलमध्ये म्हटले. वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38DV3GG
No comments:
Post a Comment