मेलबर्न: एडिलेडमधील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय संघाने मेलबर्न मैदानावरील बॉक्सिंग डे कसोटीत शानदार विजय मिळवला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. हा विजय मिळवत असताना एक मोठा झटका बसला. भारताचा जलद गोलंदाज उमेश यादवला दुखापत झाली आणि तो मैदानाबाहेर गेला. आता त्याच्या दुखापतीसंदर्भात अपडेट आले आहे. वाचा- दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी उमेश यादवला गोलंदाजी करताना दुखापत झाली आणि तो लंगडत मैदानाबाहेर गेला. आता एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार उर्वरीत दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. त्याला भारतात परत पाठवण्यात आले आहे. उमेश संघाबाहेर पडल्याने भारतीय संघाला मोठा सेटबॅक बसला आहे. उमेश बेंगळुरू येथे एनएसईमध्ये येईल आणि त्याच्या फिटनेसवर काम करेल. वाचा- दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. भारत मालिकेत कमबॅक करू शकतो आणि विजय देखील मिळून शकतो असा संदेश मेलबर्न कसोटीतून यजमानांना दिला गेला आहे. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ तयारी करत असताना उमेश यादवचे संघाबाहेर होणे हे भारतीय संघासाठी अडचणीची ठरू शकते. वाचा- ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्याआधी इशांत शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर झाला होता. त्यानंतर पहिल्या कसोटीत मोहम्मद शमीला दुखापत झाली आणि तो देखील संघाबाहेर झाला. शमीच्या जागी दुसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराजला संधी दिली. आता उमेश यादव संघाबाहेर झाल्याने एक अनुभवी गोलंदाज नसल्याचा फटका भारतीय संघाला बसू शकतो. यादवच्या जागी टी नटराजन याला संघात घेतले जाऊ शकते. नटराजनकडे अनुभव नसल्याने त्याच्या ऐवजी शार्दुल ठाकूरचा विचार केला जाऊ शकतो. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने उमेश पुढील दोन सामने खेळू शकणार नाही असे सांगितले. उमेश बुधवारीच भारतात परतणार आहे. वाचा- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ७ जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा सामना ऑस्ट्रेलियात घेण्याचा निर्णय घेतला आहे. करोना ही लढत मेलबर्न किंवा ब्रिसबेन येथे होण्याची शक्यता व्यक्त केली होती.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3o3nvYV
No comments:
Post a Comment