मेलबर्न, : सिडनीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना सिडनीला होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. पण भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा हा सिडनीमध्येच आहे. त्यामुळे रोहित शर्मा सिडनीमध्ये सुरक्षित आहे की नाही, अशा प्रश्न चाहत्यांना पडलेला होता. त्यावर आता बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी खुलासा केल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित भारतामधून जेव्हा ऑस्ट्रेलियाला जेव्हा रवाना झाला तेव्हा तो सिडनी येथे दाखल झाला होता. त्यानंतर रोहितला १४ दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले आहे. रोहित सध्याच्या घडीला सिडनी येथील एका हॉटेलमध्ये आहे आणि तो हॉटेलच्या रुममध्ये एकटाच राहत असल्याचे समजते आहे. याॉबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, " रोहित शर्माच्या संपर्कात भारतीय संघ व्यवस्थापन सातत्याने आहे. तो सध्या क्वारंटाइन असून बायो-सिक्युअर वातावरणात आहे. तो आपल्या रुममध्ये एकटाच आहे. तिथे जर काही वाईट परिस्थिती निर्माण झाली आणि रोहितला जर सिडनीमधून बाहेर काढायचे असेल तर ते प्रयत्नदेखील नक्कीच आम्ही करु. पण सध्याच्या घडीला रोहित हा सुरक्षित आहे." रोहित शर्मा हा तिसऱ्या कसोटी सामन्यापासून संघाबरोबर असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना हा ७ जानेवारीपासून सिडनी येथे सुरु होणार आहे. त्यानंतर अखेरचा आणि चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे जर कोणतीही वाईट परिस्थिती निर्माण झाली नाही तर रोहितला सिडनीमध्येच ठेवण्यात येणार आहे. युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यानंतर NCA मध्ये तो फिटनेसवर काम करत होता. फिटनेससाठी तो १९ नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये आला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निवड समितीने रोहितला दुखापतीमुळे संधी दिली नव्हती. त्यावरून बराच वाद झाल्यानंतर आयपीएलमधील फिटनेस पाहता त्याचा कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. फिटनेस टेस्ट पास झाल्यामुळे आता रोहितला ऑस्ट्रेलियाला कधी पाठवायचे याबाबतचा निर्णय बीसीसीआय आणि निवड समिती घेणार होती. रोहित आधीच पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. तिकडे ऑस्ट्रेलियात विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतात परत येईल. कोहली भारतात परतल्यानंतर त्याच्या जागी रोहित सारखा फलंदाज संघात असेल तर भारतासाठी आश्वासक ठरू शकते. रोहितने भारताकडून २२४ वनडे, १०८ टी-२० लढती आणि ३२ कसोटी खेळल्या आहेत. रोहितने ३२ कसोटीत ४६.५४च्या सरासरीने २ हजार १४१ धावा केल्या आहेत. यात ६ शतक आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे. २१२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/38vgNUK
No comments:
Post a Comment