मेलबर्न: दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने इतिहास घडवत ऑस्ट्रेलियाचा ८ विकेटनी पराभव केला. अजिंक्य रहाणेने केलेले शानदार नेतृत्व आणि फलंदाजी त्याला सुरेख साथ दिली ती गोलंदाजांनी. अजिंक्यने पहिल्या डावात ११२ तर दुसऱ्या डावात नाबाद २७ धावा केल्या. यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या विजयासह भारतीय संघाने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी केली. वाचा- दुसऱ्या कसोटी अजिंक्य रहाणेला सामनावीर पुरस्कार मिळाला असला तरी या विजयाचे खरे श्रेय गोलंदाजांचे म्हणावे लागले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला फक्त १९५ धावांवर रोखले आणि दुसऱ्या डावात २०० वर गुंडाळत भारताचा विजय सोपा केला. वाचा- या सामन्यात भारताचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराहने एक खास विक्रम स्वत:च्या नावावर केला. बुमराहने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात २ विकेट घेतल्या. मेलबर्न मैदानावर त्याची कामगिरी नेहमीच चांगली झाली आहे. भारताच्या गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मेलबर्न मैदानावर बुमराहने ९ विकेट घेतल्या होत्या. तर यावेळी त्याने ६ विकेट घतल्या. मेलबर्नवरील त्याच्या बळींची संख्या १५ इतकी झाली असून त्याने यांचा विक्रम त्याने मागे टाकला आहे. वाचा- मेलबर्न मैदानावर कपिल देव यांनी १४ विकेट घेतल्या आहेत. आता बुमराहच्या नावावर १५ विकेट झाल्या आहेत. बुमराहने कपिल देव यांच्या विक्रम मागे टाकताना अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली. कुंबळेने मेलबर्नवर १५ विकेट घेतल्या आहेत. अश्चर्य म्हणजे बुमराहने कसोटी करिअरमध्ये फक्त १६ सामने खेळले आहेत. या १६ लढतीत त्याने ७६ विकेट घेतल्या आहेत. इतक नव्हे तर बुमराहने त्याच्या सर्व कसोटी लढती भारताबाहेर खेळल्या आहेत.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3pvNzMD
No comments:
Post a Comment