नवी दिल्ली: भारतीय संघाचा कर्णधार याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ओळख ही रनमशीन अशी केली जाते. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अन्य कोणत्याही खेळाडूपेक्षा वेगाने धावा केल्या आहेत. शतकांच्या बाबतपण तो अन्य खेळाडूंपेक्षा आघाडीवर आहे. पण २०२० हे वर्ष मात्र विराटसाठी फार चांगले गेले नाही. कर्णधार आणि एक फलंदाज म्हणून विराटला फार यश मिळाले नाही. भारतीय संघाकडून २००८ साली पदार्पण करणाऱ्या विराट कोहलीला गेल्या १२ वर्ष प्रथमच कॅलेंडर वर्षात एकही शतक झळकावता आले नाही. या वर्षी श्रीलंका, ऑस्ट्रेलिया मग न्यूझीलंड आणि आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वनडे, टी-२० आणि कसोटीत विराट शतक करू शकला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एडेलिड येथे झालेल्या कसोटीत शतक झळकावण्याची त्याला अखेरची संधी होती. कारण २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो खेळणार नाही. मुलाच्या जन्मासाठी तो भारतात परत येणार आहे. वाचा- २००८ साली पदार्पणाच्या वर्षात विराटने शतक केले नव्हते. तेव्हा त्याने फक्त पाच सामने खेळले होते. पण यावर्षी विराटने २२ सामने खेळले. करोना मुळे भारतीय संघाचे अनेक सामने झाले नाहीत. जवळपास ९ महिने सामने खेळवण्यात आले नाहीत. २००९ नंतर प्रथमच विराटने २२ पेक्षा कमी सामने खेळले आहेत. या वर्षी विराटने सात अर्धशतकी खेळी केल्या. वाचा- २०१९ साली विराटने सात शतके आणि १४ अर्धशतक केली होती २०१८ साली ११ शतक आणि ९ अर्धशतके, २०१७ साली ११ शतक आणि १० अर्धशतके केली होती. या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन वेळा शतकाच्या जवळ जाऊन विराट बाद झाला. एडिलेड येथे झालेल्या अखेरच्या कसोटीतील पहिल्या डावात तो ७४ धावांवर धावबाद झाला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3rgfmlZ
No comments:
Post a Comment