Ads

Wednesday, December 30, 2020

भारतीय संघाच्या माजी कर्णधाराचा भीषण अपघात; क्रिकेटपटू थोडक्यात बचावला

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद () याच्या गाडीला अपघात झाला आहे. राजस्थानमधील सोनवाल येथे झालेल्या या अपघातात अझरुद्दीन थोडक्यात वाचला. अझरच्या खासगी सचिवाने दिलेल्या माहितानुसार या अपघातात त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही, तो पूर्णपणे सुरक्षीत आहे. या अपघातात एक युवक जखमी झाल्याचे वृत्त आहे. वाचा- एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याचे दिसून येते. गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. अझरच्या गाडीला लालसोट कोटा मेगा हायवेवर अपघात झाला. अझर त्याच्या कुटुंबासह रणथभौर भवनकडे येत होता. गाडी अझर सोबत असलेल्या एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातात गाडी एका ढाब्याला धडकली. अझर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सवाइ माधोपूरकडे जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. अपघातानंतर दुसऱ्या गाडीने अझर आणि त्याच्या कुटुंबीयांना हॉटेलमध्ये पोहोचवण्यात आले. वाचा- वाचा- भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी कर्णधारांमध्ये अझरचा समावेश होतो. तो सध्या हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आहे. सप्टेंबर २०१९ साली तो अध्यक्ष झाला होता. त्याने ९९ कसोटी आणि ३३४ वनडे सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले. ९९ कसोटी अझरने ४५.०३च्या सरासरीने ६ हजार २१५ धावा केल्या. यात २२ शतक आणि २१ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीत १९९ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. १९८४ साली इंग्लंडविरुद्ध कसोटीत पदार्णातच त्याने शतक झळकावले होते. इतक नव्हे तर अझरने पहिल्या ३ कसोटीत शतक केले होते. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. वाचा- वाचा- वनडेतील ३३४ सामन्यात अझरने ३६.९२च्या सरासरीने ९ हजार ३७८ धावा केल्या. यात ७ शतक आणि ५८ अर्धशतकांचा समावेश होता. नाबाद १५३ ही त्याची वनडेतील सर्वोच्च खेळी आहे. मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे त्याचे क्रिकेट करिअर २००० साली संपुष्टात आले. पण त्यानंतर न्यायालयीन लढाईत त्याचा विजय झाला आणि बीसीसीआयने त्याच्यावरील बंदी मागे घेतली. वनडे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक वेळा देशाचे नेतृत्व अझरने केले आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2MkNe0Y

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...