नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये नेहमी अंपायरच्या खराब निर्णयावरून वाद होतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बरोबरच लीग स्पर्धांमध्ये DRS पद्धत सुरू केली आहे. तरी देखील मैदानावर असणाऱ्या अंपायरकडून किमान काही अपेक्षा असतात. त्या जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा टीका सुरू होते. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या आयपीएलच्या १३व्या हंगामात देखील खराब अंपायरिंग दिसली. यावर अन्य देशातील माध्यमांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. आता अशीच खराब अंपयरिंग ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ( ) स्पर्धेत पाहायला मिळाली. या अंपायरिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पत्रकारांपासून ते क्रिकेट चाहत्यांपर्यंत सर्वजण याबाबत प्रश्न विचारत आहेत. वाचा- बिग बॅश स्पर्धेत ब्रिस्बेन हीट आणि एडिलेड स्ट्रायकर (Brisbane Heat vs Adelaide Strikers) यांच्यात झालेल्या सामन्यात ही घटना घडली. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करणारा ब्रिस्बेन हीट संघ १५१ धावांचा पाठलाग करत होता. खेळपट्टीवर टॉम कूपर फलंदाजी करत होता. फिरकीपटू ब्रिग्सच्या चेंडूवर कूपरने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या बॅटला लागून पॅडला लागला होता. तरी अंपायरने कूपरला बाद दिले. यावर कूपरला देखील धक्का बसला. वाचा- वाचा- टिव्हीवर स्पष्टपणे दिसत होते की, चेंडू बॅटला लागून पॅडला लागला आहे. अंपायरच्या या निर्णयावर समालोचन करणाऱ्या शेन वॉन देखील म्हणाला ही तर हद्दच झाली. अंपायरने फलंदाजाला बाद देण्याआधी थोडा देखील विचार केला नाही. या सामन्यात ब्रिस्बेन हीट संघाचा २ धावांनी पराभव झाला. त्यांनी २० षटकात १४८ धावा केल्या.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2WHP3Hc
No comments:
Post a Comment