मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने विजय मिळवला. बॉक्सिंग डे कसोटीत भारताचे नेतृत्व () ने केले. त्याने पहिल्या डावात ११२ धावांची शतकी खेली केली. तर दुसऱ्या डावात नाबाद २७ धावा केल्या. रहाणेने केलेल्या फलंदाजी आणि नेतृत्वामुळे भारताने या सामन्यात ८ विकेटनी विजय मिळवला. वाचा- वाचा- अजिंक्य रहाणेला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्याच बरोबर मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या ऑनर्स बोर्डा () वर दुसऱ्यांदा अजिंक्य रहाणेचे नाव लिहले गेले. याआधी डिसेंबर २०१४ मध्ये रहाणेने याच मैदानावर शतक केले होते. तेव्हा प्रथम त्याचे नाव ऑनर्स बोर्डावर लिहले गेले. अजिंक्यने २०१४ साली १४७ धावा केल्या होत्या. भारतीय क्रिकेट बोर्डाने त्याचे नाव या बोर्डावर लावत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाचा- दुसऱ्या कसोटी सामावीर पुरस्कार मिळवणाऱ्या अजिंक्यला पहिला मुलघ मेडल देखील देण्यात आले. हा पुरस्कार जॉनी मुलघ यांच्या सन्मानात देण्यास सुरूवात केली आहे. सामना झाल्यानंतर अजिंक्यने विजयाचे श्रेय संघातील सर्व सहकार्यांना दिले होते. त्याने गोलंदाज आणि पदार्पण करणाऱ्या शुभमन गिल, मोहम्मद सिराज यांचे कौतुक केले. वाचा- वाचा- दोन्ही देशातील तिसरी कसोटी ७ जानेवारीपासून सिडनी मैदानावर होणार आहे. सिडनी शहरात करोना रुग्णांची संख्या वाढल्याने कसोटी सामन्याचे ठिकाण बदलले जाऊ शकते.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2WYy4QW
No comments:
Post a Comment